२१ सेकंदात ३ कानाखाली लागवल्या आणि २१ लाठ्या मारल्या; नंतर तोंडावर थुंकली, व्हिडिओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 13:39 IST2022-07-25T13:38:40+5:302022-07-25T13:39:30+5:30

Crime News : तरुणाला मारहाण केल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांत तक्रार करून त्याला अटक केली.

Boy molestation girl student beating stick bareilly uttar pradesh police | २१ सेकंदात ३ कानाखाली लागवल्या आणि २१ लाठ्या मारल्या; नंतर तोंडावर थुंकली, व्हिडिओ झाला व्हायरल

२१ सेकंदात ३ कानाखाली लागवल्या आणि २१ लाठ्या मारल्या; नंतर तोंडावर थुंकली, व्हिडिओ झाला व्हायरल

उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिथे एका विद्यार्थिनीने रस्त्याच्या मधोमध एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. कोचिंगला जाताना एक व्यक्ती अनेकदा विनयभंग करायचा असा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. यावेळी स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला पकडून बेदम मारहाण केली. रस्त्याच्या मधोमध या विद्यार्थिनीने तरुणावर २५ लाठ्या मारल्या आणि तोंडावर थुंकली.

तरुणाला मारहाण केल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांत तक्रार करून त्याला अटक केली. पीडितेने आपल्या लेखी तक्रारीत पोलिसांना सांगितले की, ती स्कूटीने कोचिंगसाठी जात होती. त्यानंतर एका तरुणाने त्यांच्या मोटरसायकलला स्कूटीने धडक दिल्याने ती पडली. त्यानंतर तरुणाने तिच्याशी गैरवर्तन सुरू केले.

यावेळी तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले आणि त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या या घटनेचा कोणीतरी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याचवेळी फतेहगंज पूर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी संजय सिंह यांनी आज तकला सांगितले की, कोचिंगला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा एका तरुणाने विनयभंग केला. तरुणीच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाची तुरुंगात रवानगी करण्यात येत आहे.

Web Title: Boy molestation girl student beating stick bareilly uttar pradesh police