बाउन्सर पतीने कुटुंब संपवलं, पत्नी आणि सव्वा वर्षाच्या मुलाची केली हत्या अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 21:32 IST2022-01-17T21:31:31+5:302022-01-17T21:32:10+5:30
Double Murder And Suicide :दोन्ही हत्या केल्यानंतर पती ट्रेनसमोर जाऊन झोपला. घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

बाउन्सर पतीने कुटुंब संपवलं, पत्नी आणि सव्वा वर्षाच्या मुलाची केली हत्या अन्...
नवी दिल्ली : हरियाणातील पानिपत जिल्ह्यातून दुहेरी हत्या आणि आत्महत्येचे एक भयानक प्रकरण समोर आले आहे. येथील एका गावात पतीने पत्नी आणि सव्वा वर्षाच्या मुलाची हत्या करून स्वत:ही मृत्यूला कवटाळले. दोन्ही हत्या केल्यानंतर पती ट्रेनसमोर जाऊन झोपला. घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
कौटुंबिक कलहाचे कारण सांगितले जात आहे
पोलिसांनी सांगितले की, पानिपतच्या सिवाह गावात कौटुंबिक वादातून गुरुवारी एका तरुणाने आपली २६ वर्षीय पत्नी आणि सव्वा वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. यानंतर गावाजवळून जाणाऱ्या रेल्वे रुळावर झोपून त्याने जीव दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. रमेश कादियान हा तरुण 28 वर्षांचा असून तो दिल्लीतील एका प्रॉपर्टी डीलरकडे बाऊन्सर म्हणून काम करत होता.
हत्येनंतर मालक आणि मेहुण्याला फोन केला
कडियान गावात घर बांधण्यासाठी रमेश दीड महिन्यापूर्वी रजेवर घरी आला होता. हिंदुस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास त्याने त्याचा बॉस पदम पंवार यांचा मुलगा नितीन याला फोन केला आणि त्याने पत्नी अन्नू आणि मुलगा कविश यांची हत्या केल्याचे सांगितले. आता तो देखील आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर जात आहे असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने सोनीपतमध्ये राहणाऱ्या आपल्या मेहुण्यालाही फोन करून हा प्रकार सांगितला.
मॉर्निंग वॉकसाठी निघालेली मुलगी घरी परतली नाही, अपहरण करून निर्जनस्थळी नेऊन केला गँगरेप
नितीनने रमेशचे वडील पालेराम यांना फोन करून संपूर्ण हकीकत सांगितल्यावर त्यांनी तत्काळ त्याची खोलीत पोहोचले. तेथे त्यांना सून आणि नातवाचे मृतदेह आढळून आले. यानंतर ते रेल्वे रुळावर पोहोचले मात्र तोपर्यंत रमेशने आत्महत्या केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.