शौचालयातून बाहेर येण्यास उशीर झाल्याने लोखंडी रॉडने मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 15:46 IST2019-03-15T15:38:42+5:302019-03-15T15:46:16+5:30

शौचालयातून बाहेर येण्यास उशीर झाल्याच्या कारणावरुन दोघांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. १४) भोसरी येथे घडली.

Both of them were beaten by iron rods due to delay in getting out from toilets | शौचालयातून बाहेर येण्यास उशीर झाल्याने लोखंडी रॉडने मारहाण 

शौचालयातून बाहेर येण्यास उशीर झाल्याने लोखंडी रॉडने मारहाण 

पिंपरी : शौचालयातून बाहेर येण्यास उशीर झाल्याच्या कारणावरुन एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. १४) भोसरी येथे घडली. शशिकांत मुकुंदराव बिराजदार (वय २६, रा. तपस्या हौसिंग सोसायटी, मिनीमार्केटजवळ, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीतील हनुमाननगर येथील बिराजदार हे वैष्णवी इंजिनिअरिंग मुरकुटे इंडस्ट्रिज या कंपनीत बुधवारी रात्री आठच्या सुमारास काम करीत होते. दरम्यान, नैसर्गिक विधीसाठी तेथील शौचालयात गेले. त्यानंतर थोड्या वेळाने बाहेर आले असता आरोपीने एवढ्या वेळ काय करीत होतास असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच इतर मित्रांना बोलावून घेत फिर्यादी व त्यांच्या भावाला लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Both of them were beaten by iron rods due to delay in getting out from toilets