शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी प्रवासात दोघांचे दागिने लांबविले, पावणेपाच लाखांचा ऐवज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 14:48 IST

पीएमपीने प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना चोरट्यांनी चांगलाच दणका देत पावणेपाच लाखांना लुटले.

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकाच्या बॅगेतील पर्समध्ये ४ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले बंडगार्डन रस्त्यावर पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्स ५० हजारांचे मंगळसूत्र लंपास

पुणे : पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या बॅगेतील पर्समध्ये ४ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. दरम्यान, बंडगार्डन रस्त्यावर पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत ७१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक मूळचे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात असलेल्या दत्तनगर गावातील रहिवासी आहेत. कामानिमित्त ते पुण्यात आले होते. आळंदी ते स्वारगेट या मार्गावरील पीएमपी बसमधून ते १४ नोव्हेंबरला स्वारगेटला येत होते. बसमध्ये गर्दी होती. प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकाच्या बॅगेतील पर्समधील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. स्वारगेट येथील पीएमपी स्थानकावर बस थांबल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. जायभाय तपास करत आहेत. दरम्यान, बंडगार्डन रस्त्यावर पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्स ५० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वाडिया महाविद्याालयजवळ असलेल्या पीएमपी थांब्याजवळ थांबली होती. तेथून ते बसमधून जात असताना प्रवासादरम्यान चोरट्याने महिलेचे लक्ष चुकवून पर्समधील मंगळसूत्र लांबविल्याचा प्रकार घडला होता़

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPMPMLपीएमपीएमएलGoldसोनंtheftचोरी