अर्णब गोस्वामी यांच्या गाडीवर शाई फेेेकली, अंगरक्षकांंनी दोघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 04:32 PM2020-04-23T16:32:02+5:302020-04-23T16:32:44+5:30

गोस्वामींच्या अंगरक्षकांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. 

The bodyguards took the two into custody, who were thrown ink on Arnab Goswami's vehicle pda | अर्णब गोस्वामी यांच्या गाडीवर शाई फेेेकली, अंगरक्षकांंनी दोघांना घेतले ताब्यात

अर्णब गोस्वामी यांच्या गाडीवर शाई फेेेकली, अंगरक्षकांंनी दोघांना घेतले ताब्यात

Next
ठळक मुद्देकाल रात्री 12.20 वाजताच्या दरम्यान गोस्वामी अंगरक्षकासह पत्नीसोबत स्टुडिओतून घराकडे जात असताना त्यांच्यावर दोन अज्ञातांनी गाडी अडवली.याप्रकरणी ना.म.जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई - रिपल्बिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे मुख्य  संंपादक अर्णब गोस्वामी यांनी पालघर हत्याकांडाच्या घटनेबाबत न्यूज चॅनेलवर जे वार्तांकन केले. त्यावरुन सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजला आहे. पालघर मॉब लिंचींगमध्ये 2 हिंदू साधूंची आणि वाहन चालकाची हत्या करण्यात आली. त्यावरुन ८० टक्के हिंदू असलेल्या भारत देशात हिंदू साधूंची हत्या होते, असे म्हणत अर्णब यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अनेक नेटीझन्सने त्यांच्यावर केला आहे. कदाचित, याच घटेवरुन पत्रकार गोस्वामी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल रात्री 12.20 वाजताच्या दरम्यान गोस्वामी अंगरक्षकासह पत्नीसोबत स्टुडिओतून घराकडे जात असताना त्यांच्यावर दोन अज्ञातांनी गाडी अडवली. गाडीच्या काचेवर हाताने थापा मारून गाडीवर बाटलीतून आणलेली शाई टाकली. नंतर गोस्वामींच्या अंगरक्षकांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. 

मुंबईत पत्रकार अर्णब गोस्वामींच्या गाडीवर हल्ला, पोलिसात तक्रार दाखल

याप्रकरणी ना.म.जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनीअटक केली आहे. भा. दं. वि. कलम 341, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र मीडिया पर्सन्स अँड मीडिया इन्स्टिट्यूशन ऍक्ट 2017 कलम 3, 4 चा देखील समावेश करण्यात आला आहे. अर्णब यांनी आपल्या चॅनलवर या संदर्भात वार्तांकन करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही सडकून टीका केली होती. ईटलीवाली सोनियाजी... असा त्यांचा वारंवार उल्लेख केल्याने काँग्रेस नेत्यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. 

Web Title: The bodyguards took the two into custody, who were thrown ink on Arnab Goswami's vehicle pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.