मुंडकं नसलेला महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 16:23 IST2021-07-26T16:22:42+5:302021-07-26T16:23:24+5:30
Crime News : वसईत खळबळ; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान

मुंडकं नसलेला महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला
नालासोपारा : वसईच्या समुद्रकिनारी सोमवारी सकाळी एका ३० ते ३२ वयोगटातील महिलेची हत्या करून मुंडके नसलेला मृतदेह सुटकेसमध्ये सापडल्याने वसईत एकच खळबळ माजली आहे. वसई पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांसमोर सदर महिलेची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे.
वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुईगाव खाडी किनारी एका सुटकेसमध्ये मृतदेह असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मिळाली. ही माहिती मिळताच ते स्वतः पोलीस अधिकारी आणि अंमलदार घेऊन पोहचले. त्यावेळी ३० ते ३२ वयोगटातील महिलेचे मुंडके नसलेला मृतदेह पोलिसांना दिसला. वसईच्या समुद्रकिनारी गेल्या काही दिवसांपासून मृतदेह भेटण्याची पाचवी वेळ आहे. पावसाच्या वेळी ठाणे, नवी मुंबई येथून मृतदेह समुद्रकिनारी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वसईच्या समुद्रकिनारी मृतदेह सापडण्याची पाचवी वेळ आहे. हा मृतदेह पाण्याच्या प्रवाहाबरोबर सुटकेसमध्ये वाहून आला असून अंदाजे तीन दिवसांपूर्वी हत्या केलेला मृतदेह आहे. वसई पोलीस ठाण्यात हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार आहे. - संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय