आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:23 IST2025-08-28T11:17:28+5:302025-08-28T11:23:17+5:30

MLA Crime news: मध्य प्रदेशातील आमदाराच्या मुलाच्या घरात कामाला असलेल्या एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह बंगल्याच्या परिसरातच लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. 

Body of young housemaid found hanging in MLA's son's bungalow | आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

Crime News Latest: मध्य प्रदेशातील खरगापूर मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार चंदा सिंह गौर यांच्या मुलाच्या बंगल्यात एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही तरुणी बंगल्यात घरकाम करायला होती. बंगल्याच्या परिसरात असलेल्या एका झाडाला तिचा मृतदेह लटकलेला होता. तरुणीच्या चेहऱ्यावर जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे तिने आत्महत्या केली की, तिला मारले, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मध्य प्रदेशातील टीकमगढ जिल्ह्यात खरगापूर मतदारसंघ आहे. आमदार चंदा सिंह गौर यांचा मुलगा अभियंत सिंह गौर याचा छतरपूर येथील बंगल्यात ही घटना घडली आहे. सिव्हिल लाईन पोलिसांनी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर कुटुंबीयांना सोपवण्यात आला.

तरुणीच्या मृत्यूची माहिती दाबण्याचा प्रयत्न?

सपना रैकवार असे मयत २० वर्षीय तरुणीचे नाव आहे. ही घटना सोमवारी (२५ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली. पण, याबद्दलची माहिती दाबण्याचा प्रयत्न झाला. तातडीने तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला गेला आणि त्यानंतर तो तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. घरकाम करणाऱ्या महिलांनी एकमेकींना या घटनेबद्दल सांगितल्यानंतर सपनाच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले. 

काँग्रेस आमदार पुत्र काय म्हणाले? 

आमदार चंदा सिंह गौर यांचा मुलगा अभियंत गौर सिंह याबद्दल बोलताना म्हणाले की, 'घटना घडली त्यावेळी मी दिल्लीमध्ये होतो. घरी माझी पत्नी आणि १७ वर्षाचा मुलगाच होता. त्यांनी मला कॉल करून याबद्दल माहिती दिली. मी दुसऱ्या दिवशी घरी पोहोचलो. 

"सपनाने टोकाचे पाऊल का उचलले, याची मला कल्पना नाही. ती मोबाईल वापरत नव्हती आणि कधीही चिंतेत दिसली नाही. ती माझी नोकर नव्हती, तर मुलीसारखीच होती. वयाच्या ५व्या वर्षापासून ती आमच्यासोबत राहत होती. आम्ही तिच्या लग्नासाठी स्थळही शोधत होतो", असे अभियंत सिंह गौर यांनी सांगितले. 

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले

सपनाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी बंगल्याच्या परिसरात असलेल्या सगळ्या सीसीटीव्हींचा डीव्हीआर जप्त केला. सपनाच्या मृत्यूनंतर तिची आई आली. पण, त्यांनी पोलिसांना कोणतीही तक्रार दिलेली नाही. प्रथम दर्शनी पोलिसांनी सपनाने आत्महत्या केली असावी, असे म्हटले आहे. पण, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. 

Web Title: Body of young housemaid found hanging in MLA's son's bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.