आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला

By अभिनय खोपडे | Published: August 30, 2023 11:16 PM2023-08-30T23:16:34+5:302023-08-30T23:44:14+5:30

सदरची घटना समजताच आ.राजकुमार पटेल यांनी पोलीस अधिक्षक वर्धा यांना संपर्क करुन घटनेची कसून चौकशी करण्याची विनंती केली

Body of Ashram school student found in suspicious condition | आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला

आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला

googlenewsNext

वर्धा : कारंजा तालुक्याच्या नारा येथील यादवरावजी केचे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. मेळघाटाच्या चिखलदरा तालुक्यामधील डोमा या गावातील शिवम सनोज उईके या १२ वर्षीय बालकाचा आश्रम शाळेमधील गादी खाली मृतदेह आढळुन आला. या अकस्मात मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे.  

सदरची घटना समजताच आ.राजकुमार पटेल यांनी पोलीस अधिक्षक वर्धा यांना संपर्क करुन घटनेची कसून चौकशी करण्याची विनंती केली. त्यानुसार कारंजा घाडगे पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाडे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. प्रथम दर्शनी मृत्यु संशयास्पद असल्याचे निदर्शनात येत आहे. सदर घटना ही रात्री ८.३० वाजता घडलेली असून सकाळी सदर बालकाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार गाडे यांनी दिली आहे. आश्रम शाळेतील मुलं गाद्यांची थप्पी लावत असतात. रात्री झोपण्यासाठी गाद्यांची ही थप्पी काढत असताना मुलगा मृत अवस्थेत आढळून आला अशी प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, बालरोग तज्ञांकडून इन कॅमेरा या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची मागणी डोमा तालुका चिखलदरा येथील सरपंच सुनील उईके यांनी केली आहे

Web Title: Body of Ashram school student found in suspicious condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.