नांदिवली तलावात सापडला बेपत्ता तरुणाचा मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 19:04 IST2019-04-01T19:03:06+5:302019-04-01T19:04:45+5:30

मृत इसमाचे नाव शैलेश राऊत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

The body of the missing youth found in Nandivali lake | नांदिवली तलावात सापडला बेपत्ता तरुणाचा मृतदेह 

नांदिवली तलावात सापडला बेपत्ता तरुणाचा मृतदेह 

ठळक मुद्देर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह तलावातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. या तरुणाच्या मृत्यू मागील कारण अद्यापही अस्पष्ट असल्याने पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.

ठाणे -  कल्याण पूर्व येथील नांदिवली तलावात आज पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास एका तरुणाचा म्रूतदेह आढळून आला. त्यानंतर परिसरात खळबळ माजली होती. नंतर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह तलावातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. मृत इसमाचे नाव शैलेश राऊत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

शैलेश हा दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याने त्याच्या भावाने कोलसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.  त्यानुसार पोलीस तपास करीत होते. तपास सुरु असताना तलावाच्या बाजूला राहणाऱ्या रहिवाश्याने दिलेल्या माहितीनुसार पोलीस आणि अग्निशमन दल यांनी अखेर त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले आणि दोन दिवसांनी आज पहाटे या तरुणाचा मृतदेह तलावातून काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण येथे नेण्यात आला या तरुणाच्या मृत्यू मागील कारण अद्यापही अस्पष्ट असल्याने पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.  

Web Title: The body of the missing youth found in Nandivali lake