हरवलेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 16:18 IST2019-10-31T16:15:06+5:302019-10-31T16:18:49+5:30

तो मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता झाला होता.

The body of the missing 12-year-old boy was found | हरवलेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला

हरवलेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला

ठळक मुद्देआर्यन गुप्ता असे मुलाचे नाव असून तो सहावीचा विद्यार्थी आहे. जोगेश्वरीच्या मिल्लतनगर परिसरात आर्यन कुटुंबीयांसोबत राहायचा.

मुंबई - जोगेश्वरीतून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा वर्सोवाच्या समुद्रकिनारी मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. आर्यन गुप्ता असे मुलाचे नाव असून तो सहावीचा विद्यार्थी आहे. तो मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता झाला होता.

जोगेश्वरीच्या मिल्लतनगर परिसरात आर्यन कुटुंबीयांसोबत राहायचा. मंगळवारी सायंकाळपासून तो बेपत्ता झाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा काहीच थांगपत्ता न लागल्याने गुप्ता कुटुंबीयांनी ओशिवरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. हा शोध सुरू असतानाच बुधवारी वर्सोवाच्या समुद्रकिनारी त्याचा मृतदेह सापडला.

प्राथमिक तपासात तो बुडाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याची हत्या केल्याचा संशय कुटुंबीयांना आहे.
त्याच्या अंगावर जखमा असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका मुलीचे अपहरण झाले व त्यानंतर तिचा मृतदेह सापडला होता़ त्यामुळे संतप्त जमावाने रास्ता रोको केला व पोलिसांनाही धक्काबुकी झाली
होती़

Web Title: The body of the missing 12-year-old boy was found