अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह, सामूहिक बलात्कारानंतर केली हत्या; लोकं उतरली रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 21:54 IST2021-11-22T21:50:06+5:302021-11-22T21:54:28+5:30
Murdered after gang rape : रेल्वे रुळाच्या बाजूला बागर येथून अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. बेपत्ता जीविका सीएम अशी शुक्रवारी ओळख पटली.

अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह, सामूहिक बलात्कारानंतर केली हत्या; लोकं उतरली रस्त्यावर
औरंगाबाद - बिहारमधील औरंगाबादमध्ये रविवारी लोकांचा संताप शिगेला पोहोचला होता. लोक मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरले आणि सामूहिक बलात्कारानंतर जीविका कामगाराच्या हत्येप्रकरणी संताप व्यक्त केला. या कँडल मार्चमध्ये अनेक जण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
गँगरेपनंतर झालेल्या हत्येने औरंगाबाद हादरले
१८ नोव्हेंबर रोजी जीविका प्रकल्पात काम करणारी महिला अचानक बेपत्ता झाली होती. बागोई स्टेशनवरून ट्रेन पकडल्यानंतर ती गुरुवारी रफीगंजला बाजारातून सामान आणण्यासाठी गेली होती, मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही. बराच शोध घेतल्यानंतर कुटुंबीयांनी फासर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.
ट्रेनमधून ओढून सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याचा संशय
फासर पोलीस ठाणे या महिलेचा शोध घेत असतानाच दुसरीकडे रफीगंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी रात्री उशिरा देव रोड हॉल्ट स्टेशनजवळील रेल्वे रुळाच्या बाजूला बागर येथून अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. बेपत्ता जीविका सीएम अशी शुक्रवारी ओळख पटली. जीविका दीदीला आधी ट्रेनमधून ओढल्याचा संशय आहे. यानंतर सामूहिक बलात्कार करून प्रकरण अपघाताचे भासवण्यासाठी मृतदेह रेल्वे ट्रॅकच्या बाजूला शेतात फेकून दिला.
गँगरेपनंतर हत्येचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला
या प्रकरणी रफीगंज पोलीस शनिवारी सकाळी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या सदर रुग्णालयात आले. मृतदेह पाहताच कुटुंबीय संतापले आणि त्यांनी जीविका सीएमचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप केला.