ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 07:25 IST2026-04-28T07:24:51+5:302026-04-28T07:25:22+5:30

९ जानेवारी रोजी झालेल्या तीव्र भांडणानंतर महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयावरून जोसेफ आणि मारिया तसेच मुलगा काल्टन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले

Body Discovered During Drainage Cleaning; Brother Arrested by Andheri Police for Murdering Sister and Disposing of Body | ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत

ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत

मुंबई - सतत होणाऱ्या वादातून ८० वर्षीय बहिणीची हत्या करून मृतदेह ड्रेनेज लाइनमध्ये फेकणाऱ्या भावाला व त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली. तीन महिन्यांपूर्वी झालेले हे हत्याकांड ड्रेनज लाइनच्या सफाई कामादरम्यान उघडकीस आल्याचे अंधेरी पोलिसांनी सांगितले. 

२४ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बृहन्मुंबई पालिकेचे कर्मचारी ड्रेनेज साफसफाईचे काम करताना ओमनगर, मरोळ पाइपलाईन, अंधेरी पूर्व येथील मॅनहोलमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच अंधेरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह कुजल्यामुळे महिलेची ओळख पटविणे आवाहन होते. या प्रकरणाचा तपासासाठी पोलिसांचे पथके नेमण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील हरवलेल्या व्यक्तींची माहिती घेतली. मृतदेहावरील दागिन्यांच्या आधारे महिलेचे नाव ब्लान्स जेम्स सिक्वेरा असल्याचे समजले. 

पाेलिसांत खाेटी तक्रार
१० जानेवारीपासून बेपत्ता असल्याप्रकरणी सहार पोलिस ठाण्यात नोंद होती. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता मृत महिलेचे तिचा भाऊ जोसेफ कोयलो आणि त्याची पत्नी मारिया कोयलो यांच्याशी वारंवार वाद होत असल्याचे समोर आले.

अंधेरी पाेलिसांनी भावासह पत्नीला ठोकल्या बेड्या
९ जानेवारी रोजी झालेल्या तीव्र भांडणानंतर महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयावरून जोसेफ आणि मारिया तसेच मुलगा काल्टन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सखोल चौकशीत जोसेफ याने १० जानेवारीच्या मध्यरात्री बहिणीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मॅनहोलमध्ये टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने पत्नीच्या मदतीने सहार पोलिस ठाण्यात बहीण बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी जोसेफ आणि मारिया यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Web Title : ड्रेनेज सफाई से हत्या का खुलासा: बहन की हत्या में भाई गिरफ्तार

Web Summary : मुंबई: तीन महीने पहले अपनी बहन की हत्या कर शव को ड्रेनेज लाइन में फेंकने के आरोप में एक व्यक्ति और उसकी पत्नी को गिरफ्तार किया गया। अंधेरी में ड्रेनेज की सफाई के दौरान हत्या का खुलासा हुआ। भाई ने झूठी गुमशुदगी की रिपोर्ट दर्ज कराई थी।

Web Title : Drainage Cleaning Uncovers Murder: Brother Arrested for Sister's Killing

Web Summary : Mumbai: A man and his wife were arrested for killing his sister three months ago and disposing of her body in a drainage line. The murder was revealed during routine drainage cleaning in Andheri. The brother confessed to the crime after initially filing a false missing person report.