बदलापूरच्या जंगलात आढळला गुप्तांग कापलेला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 19:37 IST2019-04-11T19:36:01+5:302019-04-11T19:37:05+5:30
याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापूरच्या जंगलात आढळला गुप्तांग कापलेला मृतदेह
बदलापूर - बदलापूर येथील जंगलात गुप्तांग कापलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती ३५ वयोगटातील असण्याची शक्यता आहे. मृतदेहावर चाकूने भोसकल्याच्या अनेक खूणा आहेत आणि दातही तुटलेले आहेत. याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचावली गावातील मोतीराम गावांडा हे मंगळवारी सकाळी पिंपळादाराच्या जंगलातून जात असताना सर्वप्रथम त्यांच्या नजरेस हा मृतदेह पडला. त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. बदलापूर पोलिसांनी तपास सुरु केला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. सूड भावनेतून अत्यंत क्रूर पद्धतीने या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर निळ्या रंगाची हाफ जीन्स पॅन्ट आणि निळ्या रंगाचा शर्ट आढळून आला आहे.