घरात आढळले वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह; चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 16:43 IST2021-11-03T16:40:55+5:302021-11-03T16:43:29+5:30

Murder Case : दयानंद शानबाग (९०) आणि त्यांची पत्नी विजयालक्ष्मी शानबाग (८०) हे घाटलोडिया परिसरातील पारसमणी सोसायटीमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते.

The bodies of an elderly couple found in the house; Suspected murder with intent to steal | घरात आढळले वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह; चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा संशय

घरात आढळले वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह; चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा संशय

अहमदाबाद - गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका वृद्ध जोडप्याची त्यांच्या घरात अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी दरोड्याचा संशय व्यक्त केला आहे.


पोलीस उपायुक्त (झोन-1) रवींद्र पटेल यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, दयानंद शानबाग (९०) आणि त्यांची पत्नी विजयालक्ष्मी शानबाग (८०) हे घाटलोडिया परिसरातील पारसमणी सोसायटीमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. पुढे त्यांनी सांगितले की, या जोडप्याचा मुलगा त्याच्या कुटुंबासह शहरातील दुसऱ्या भागात राहतो. मंगळवारी रात्री सोसायटीत राहणारा एक व्यक्ती या वृद्ध जोडप्याला भेटण्यासाठी आला असता त्याने दोघांना मृतावस्थेत पाहिले.


पटेल म्हणाले की, स्थानिक लोकांकडून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस दाम्पत्याच्या घरी पोहोचले असता कपाट तुटलेले आणि खोलीतील साहित्य विखुरलेले दिसले. या हत्येमागे चोरीचा उद्देश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी अधिक तपासासाठी मृताच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावले. तपासासंदर्भात पोलीस परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही स्कॅन करत आहेत.

Web Title: The bodies of an elderly couple found in the house; Suspected murder with intent to steal