BJP MLA assaulted to homeguard | भाजप आमदाराची होमगार्डला मारहाण
भाजप आमदाराची होमगार्डला मारहाण

ठळक मुद्देहे प्रकरण वणी पोलीस ठाण्यात पोहोचले असून तक्रार देऊ नये म्हणून त्या होमगार्ड जवानाचे मन वळविण्याचा प्रयत्न आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. सदर होमगार्ड साध्या वेशात वाहतूक नियंत्रण करीत होता.

यवतमाळ - वणी येथील भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मंगळवारी सायंकाळी ७ वाजता टिळक चौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या होमगार्ड जवानाला मारहाण केली. हे प्रकरण वणी पोलीस ठाण्यात पोहोचले असून तक्रार देऊ नये म्हणून त्या होमगार्ड जवानाचे मन वळविण्याचा प्रयत्न आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे.

याकामी काही पोलीसही मदत करीत असल्याची माहिती आहे. दरम्यान आमदार बोदकूरवार यांनी मारहाणीची ही घटना नाकारली आहे. सदर होमगार्ड साध्या वेशात वाहतूक नियंत्रण करीत होता. म्हणून त्याला युनिफॉर्मवर ड्युटी कर असा सल्ला आपण दिल्याचे आ. बोदकूरवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वृत्तलिहिस्तोवर पोलीस ठाण्यात आमदार व होमगार्ड उपस्थित होते, कार्यकर्त्यांचीही गर्दी होती.

Web Title: BJP MLA assaulted to homeguard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.