BJP corporator's body found in UP car in suspicious condition; Murder or suicide? | यूपीत कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला भाजपा नगरसेवकाचा मृतदेह; हत्या की आत्महत्या?

यूपीत कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला भाजपा नगरसेवकाचा मृतदेह; हत्या की आत्महत्या?

ठळक मुद्दे भाजपाचे नगरसेवक मनीष उर्फ ​​मिंटू (38) यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये सापडला आहे.

गुरुवारी मेरठमध्ये मोठी घटना घडली. प्रभाग क्रमांक 40 चे भाजपाचे नगरसेवक मुनीष उर्फ ​​मिंटू हे त्यांच्या कारमध्ये मृतावस्थेत आढळले. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आणि या प्रकरणाच्या तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूलही जप्त केली आहे. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, हत्येच्या दिशेने देखील तपास केला जात आहे.

आज कंकरखेडा पोलिस स्टेशनच्या पावली खास रेल्वे स्थानकाजवळ प्रभाग क्रमांक 40 मधील भाजपाचे नगरसेवक मनीष उर्फ ​​मिंटू (38) यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये सापडला आहे. जवळच एक पिस्तूल सापडली आहे. आत्महत्येच्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, प्राथमिक आत्महत्येचा प्रकार घडला आहे. उर्वरित तपास सुरू आहे, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. तीन वर्षांपूर्वी नगरसेवक मुनीश उर्फ ​​मिंटूच्या हॉटेलमध्ये एक तरुण महिला पोलीस निरीक्षकासह आली होती. यावेळी निरीक्षक आणि नगरसेवक यांच्यात वाद झाला. मनीषने पोलिसाला मारहाण केली होती, त्यामुळे मनीषलाही तुरुंगात जावे लागले. असे सांगितले जात आहे की, मुनीश कॅंटचे आमदार सत्य प्रकाश अग्रवाल यांचे निकटवर्तीय होते. पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे. दुसरीकडे एसपी सिटी विनीत भटनागर यांचे म्हणणे आहे की, सर्व बाजूने तपास सुरू आहे. प्राथमिक तपासणीत हे प्रकरण आत्महत्या केल्याचे दिसत आहे.

Web Title: BJP corporator's body found in UP car in suspicious condition; Murder or suicide?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.