भाजप नगरसेविका ज्योती चव्हाण गायब, पतीची पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 04:54 PM2021-03-17T16:54:53+5:302021-03-17T16:55:58+5:30

Jalgaon BJP corporator Jyoti Chavan disappears : महापौरपदाची निवडणूक जवळ आलेली असतानाच भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण गायब झाल्याची तक्रार खुद्द त्यांच्या पतींनी पोलिसात दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

BJP corporator Jyoti Chavan disappears! Husband's complaint to police | भाजप नगरसेविका ज्योती चव्हाण गायब, पतीची पोलिसात तक्रार

भाजप नगरसेविका ज्योती चव्हाण गायब, पतीची पोलिसात तक्रार

Next

 जळगाव - महापौर पदाची निवडणूक जवळ आलेली असतानाच भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण गायब झाल्याची तक्रार खुद्द त्यांचे पती बाळासाहेब यशवंतराव चव्हाण (५२,रा.आदर्श नगर) यांनी बुधवारी रामानंद नगर पोलिसात दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुरुवारी महापौरपदाची निवड होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला ही तक्रार दाखल झाली आहे. (BJP corporator Jyoti Chavan disappears! Husband's complaint to police)

बाळासाहेब चव्हाण यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,  १४ मार्च रोजी रात्री ८ वाजता पत्नी ज्योती हिने सांगितले की, महापौर पदाची निवडणूक असल्याने भाजपा नगरसेविका ॲड.शुचिता हाडा यांच्यासोबत नाशिक येथे जात आहे. त्यानंतर पत्नी नाशिक येथे अनीग गिव्ह रिसोर्ट तळवाले गाव, त्र्यंबकेश्वर येथे असल्याचे भाजप कार्यकर्त्यांकडून समजले. दुसऱ्या दिवशी पत्नीचा शोध घेण्यासाठी नाशिक येथे दुपारी ४ वाजता गेलो असता स्थानिक पोलीस निरीक्षक त्या रिसोर्टवर सोबत आले व त्यांनी दीपमाला काळे यांच्या मोबाईलवरुन पत्नीशी बोलणे करुन दिले. त्यानंतर पत्नीच्या मोबाईलवर वारंवार कॉल केले पण संपर्कच झाला नाही. पत्नीचा शोध घेऊनही ती मिळून न आल्याने कुठे तरी निघून गेल्याची खात्री झाल्यावर चव्हाण यांनी बुधवारी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून पत्नी हरविल्याची तक्रार दिली.

महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपमधील फुटीर नगरसेवकांचा गट हा अज्ञात ठिकाणी आहे. गुरुवारी ऑनलाईन सभेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड होणार असल्यामुळे अज्ञात ठिकाणी राहून सुध्दा मतदान करता येणार आहे.
 

Web Title: BJP corporator Jyoti Chavan disappears! Husband's complaint to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.