पैसाच पैसा! नोटांनी भरले २ बेड; जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:10 IST2025-01-23T13:09:29+5:302025-01-23T13:10:52+5:30
बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

फोटो - आजतक
बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बेतिया जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या घरी मोठी कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली. जिल्हा शिक्षण अधिकारी (DEO) रजनीकांत प्रवीण यांच्या निवासस्थानी छापेमारी सुरू आहे.
रजनीकांत प्रवीण यांची चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान आतापर्यंत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दोन बेड नोटांनी भरले होते. नोटा मोजण्यासाठी एक मशीन मागवण्यात आली आहे. पाटण्यातील दक्षता पथकाने आज सकाळी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी छापा टाकल्याचं सांगण्यात येत आहे. या काळात कोणालाही आत जाण्याची किंवा बाहेर येण्याची परवानगी नाही.
बेतिया येथील मुफस्सिल पोलीस स्टेशन परिसरातील बसंत बिहार कॉलनीतील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या घरी ही कारवाई करण्यात येत आहे. डीईओ रजनीकांत प्रवीण गेल्या तीन वर्षांपासून बेतिया येथे तैनात आहेत. दक्षता पथक अनेक तासांपासून त्याच्या घरी उपस्थित आहे आणि त्याची चौकशी केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. परिस्थिती अशी होती की, नोटा मोजण्याचं मशीन मागवावं लागलं आहे. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दक्षता पथकाने जिल्हा शिक्षणाधिकारी (डीईओ) च्या इतर ठिकाणीही छापे टाकले आहेत.
जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. या संदर्भात छापे टाकले जात आहेत. आर्थिक अनियमितता आणि बेकायदेशीर मालमत्तेबाबत डीईओंविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन आणि दक्षता विभागाचे अधिकारी सध्या या प्रकरणावर काहीही बोलण्याचे टाळत आहेत.