शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

गृह विभागाचा मोठा निर्णय; विनयभंगाचा आरोप असणारे डीआयजीचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 7:56 PM

राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही तात्काळ निलंबनाची कारवाई केली.

ठळक मुद्देया प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीने विनयभंगाचा आरोप केल्याने तळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.डीआयजी निशिकांत मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आजच फेटाळण्यात आल्यानंतर गृह विभागाने ही मोठी कारवाई केली आहे.

मुंबई - पुणे येथील एमटी विभागात डीआयजी पदावर होते असलेले डीआयजी निशिकांत मोरे यांचे अखेर गुहा विभागाने निलंबन केले आहे. विनयभंगाचा आरोप असणारे डीआयजी निशिकांत मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आजच फेटाळण्यात आल्यानंतर गृह विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीने विनयभंगाचा आरोप केल्याने तळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेली पीडित मुलगी अजून सापडली नाही. याप्रकरणी देखील मुलगी हरवल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. आज मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही तात्काळ निलंबनाची कारवाई केली.

निशिकांत मोरे यांच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण अन्वेषणाधीन आहे. तसेच मोरे यांच्याविरुद्ध पोलीस महासंचालक यांनी शासनास सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आज गृह विभागामार्फत शासन आदेश निर्गमित करुन मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे गृह मंत्री देशमुख यांनी सांगितले.

 

नेमके काय आहे प्रकरण?खारघरमध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे मोटर ट्रान्सपोर्ट (एमटी) विभागात कार्यरत असलेले पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी)  निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेली अल्पवयीन मुलगी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता आहे. तळोजा येथील घरातून सर्व झोपल्यानंतर रात्री 11-12च्या दरम्यान ती निघून गेली. जाताना तिने घरात सुसाईड नोट लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पॉक्सोप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

परिचित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा मोरेंवर आरोप करण्यात आला आहे. मोरे यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात गेल्यावर तक्रार दाखल करून घेतली नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी अलीकडेच खारघरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे यावेळी मुलींना वडिलांनी सांगितले होते. तळोजा वसाहतीत वास्तव्यास असलेले, विकासक असलेले पीडित मुलीचे वडील आणि डीआयजी निशिकांत मोरे यांची आठ वर्षांपूर्वी खारघरमध्ये ओळख झाली होती. मोरे यांनी त्यांच्याकडून दुकान गाळे विकत घेतले होते. काही पैसे रोख देऊन गाळ्याचा ताबा घेऊन उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारदाराने ऑगस्ट महिन्यात पोलिसांकडे लेखी स्वरूपात केला होता. दरम्यान, जून महिन्यात १७ वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी निमंत्रण नसतानाही मोरे घरी आले. केप कापून मुलीच्या गालावर आणि शरीरावर केक लावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे तळोजा पोलिसांनी सांगितले होते. मात्र, दरम्यान अटक टाळण्यासाठी मोरे यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता.

टॅग्स :suspensionनिलंबनPoliceपोलिसPOCSO Actपॉक्सो कायदा