पॉक्सोप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 06:36 PM2020-01-09T18:36:56+5:302020-01-09T18:40:17+5:30

आज सुनावणीदरम्यान न्यायालयाने जामीन फेटाळला आहे.

Increase difficulty of police officer difficulty in Pocso case; Court rejects anticipatory bail | पॉक्सोप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

पॉक्सोप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

googlenewsNext
ठळक मुद्देतळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल परिचित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा मोरेंवर आरोप करण्यात आला आहे. न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता. 

पनवेल - पॉक्सो केसप्रकरणी डीआयजी निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल कोर्टानं फेटाळला आहे. त्यामुळे मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या पुणे येथील एमटी विभागात डीआयजी पदावर मोरे कार्यरत आहेत. त्यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी पनवेल सत्र न्यायालयात मोरे यांनी धाव घेतली. मात्र, आज सुनावणीदरम्यान न्यायालयाने जामीन फेटाळला आहे.

विनयभंगाची तक्रार खोटी असल्याचा पोलीस अधिकाऱ्याने केला दावा


जामीन फेटाळल्यानंतर हायकोर्टात अपील करण्यासाठी कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. परिचित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा मोरेंवर आरोप करण्यात आला आहे. मोरे यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात गेल्यावर तक्रार दाखल करून घेतली नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी अलीकडेच खारघरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे यावेळी मुलींना वडिलांनी सांगितले होते. तळोजा वसाहतीत वास्तव्यास असलेले, विकासक असलेले पीडित मुलीचे वडील आणि डीआयजी निशिकांत मोरे यांची आठ वर्षांपूर्वी खारघरमध्ये ओळख झाली होती. मोरे यांनी त्यांच्याकडून दुकान गाळे विकत घेतले होते.

 

डीआयजी मोरे प्रकरणातील तरुणी बेपत्ता; पोलिसांकडून शोधाशोध सुरु  

काही पैसे रोख देऊन गाळ्याचा ताबा घेऊन उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारदाराने ऑगस्ट महिन्यात पोलिसांकडे लेखी स्वरूपात केला होता. दरम्यान, जून महिन्यात १७ वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी निमंत्रण नसतानाही मोरे घरी आले. केप कापून मुलीच्या गालावर आणि शरीरावर केक लावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे तळोजा पोलिसांनी सांगितले होते. मात्र, दरम्यान अटक टाळण्यासाठी मोरे यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता. 

 

Web Title: Increase difficulty of police officer difficulty in Pocso case; Court rejects anticipatory bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.