Bhima Koregaon: Supreme Court rejects anticipatory bail plea of activists Gautam Navlakha & Anand Teltumbde pda | Bhima Koregaon : नवलखा, तेलतुंबडे यांना सुप्रीम कोर्टाने दिला दणका

Bhima Koregaon : नवलखा, तेलतुंबडे यांना सुप्रीम कोर्टाने दिला दणका

ठळक मुद्देकोर्टाने नवलखा आणि तेलतुंबडे यांना शरण जाण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. ६ मार्च रोजी १६ मार्चपर्यंत या दोघांना अटक न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालया देत अंतरिम दिलासा दिला होता. 

नवी दिल्ली - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना सुप्रीम कोर्टाने दणका देत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टाने नवलखा आणि तेलतुंबडे यांना शरण जाण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. तसेच कोर्टाने त्यांना लवकरात लवकर त्यांचे पासपोर्ट सुपूर्द करण्यास सांगितले आहे.

न्या. अरुण मिश्रा आणि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने नवलखा आणि तेलतुंबडे यांना आत्मसमर्पण करण्यासाठी तीन आठवड्याचा वेळ दिला आहे. तसेच या दोघांनाही त्यांचे पासपोर्ट शक्य तितक्या लवकर पोलिसांकडे द्यावे लागतील, असा आदेश दिला. ६ मार्च रोजी १६ मार्चपर्यंत या दोघांना अटक न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालया देत अंतरिम दिलासा दिला होता. 


1 जानेवारी, 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर माओवाद्यांशी संबंधित आणि इतर अनेक आरोपांसाठी नवलखा, तेलतुंबडे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्याचबरोबर सर्व आरोपींनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Bhima Koregaon : गौतम नवलखा, तेलतुंबडे यांना हायकोर्टाने दिला दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला

Bhima Koregaon : गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम  दिलासा  

 

Web Title: Bhima Koregaon: Supreme Court rejects anticipatory bail plea of activists Gautam Navlakha & Anand Teltumbde pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.