खबरदार! महिलांकडे एकटक पहाल तर थेट जाल तुरुंगात; न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 06:13 PM2021-02-11T18:13:01+5:302021-02-11T18:13:47+5:30

Aurangabad Sessions Court : त्रास होणाऱ्या मुलींनी पुढे येऊन पोलिसात तक्रार दाखल केली. अशा रोड रोमिओंना कायद्याचा दणका देता येणार आहे, हे या निकालातून स्पष्ट केले आहे.

Beware! If you look at women alone, you will go straight to jail; An important decision was made by the court | खबरदार! महिलांकडे एकटक पहाल तर थेट जाल तुरुंगात; न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय 

खबरदार! महिलांकडे एकटक पहाल तर थेट जाल तुरुंगात; न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय 

googlenewsNext
ठळक मुद्देएका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्रास देत असलेल्याचा आरोप ठेवत २०१७ मध्ये या आरोपीला अटक केली होती.

महिलांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचं ठरवत औरंगाबादसत्र न्यायालयाने एका रोड रोमिओला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अनेक तरुणींना आणि लहान मुलींनाही अशा रोड रोमिओंच्या त्रासाला तोंड द्यावं लागतं. 

अनेकवेळी मुली कुणालाही हा त्रास कुणालाही न सांगता सहन करतात. मात्र, औरंगाबादसत्र न्यायालयाच्या या निकालामुळे अशा त्रास सहन करणाऱ्या मुलींच्या मनगटात टाकत येणार आहे. त्रास होणाऱ्या मुलींनी पुढे येऊन पोलिसात तक्रार दाखल केली. अशा रोड रोमिओंना कायद्याचा दणका देता येणार आहे, हे या निकालातून स्पष्ट केले आहे.

एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्रास देत असलेल्याचा आरोप ठेवत २०१७ मध्ये या आरोपीला अटक केली होती. ही मुलगी शाळेत जात असताना हा आरोपी सतत तिचा पाठलाग करायचा. तसेच तिच्या नजरेत येण्यासाठी सतत तिच्या घरासमोरील बगीच्यात बसून ती सायकल चालवत असताना तिला एकटक पाहत बसत असे. एकदा ती मुलगी तिच्या मामाच्या घरी गेली होती. तेव्हा त्याठिकाणी देखील या रोड रोमिओने तिच्या पाठपुरावा केला. तेव्हा मामाने आपल्या मित्रांच्या मदतीने या रोड रोमिओला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

औरंगाबाद पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान आणि 'पॉक्सो' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या खटल्यात एकूण ६ साक्षीदारांनी कोर्टात दिलेल्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. त्यानुसार या अल्पवयीन मुलीला एकटक पाहिल्याबद्दल औरंगाबादचे विशेष कोर्टाचे न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दामोदर राबडा या रोड रोमिओला ६ महिने सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Web Title: Beware! If you look at women alone, you will go straight to jail; An important decision was made by the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.