आयपीएलच्या मुंबई इंडियन विरुद्ध दिल्ली मॅचवर सट्टा; उल्हासनगरमधून तिघाना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 16:51 IST2021-10-03T16:49:46+5:302021-10-03T16:51:22+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३ हिराघाट थारासिंग दरबार परिसरातील महाबजाज व्हिला बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट मॅचमधील मुंबई इंडियन विरुद्ध दिल्ली कॅपिटल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती.

आयपीएलच्या मुंबई इंडियन विरुद्ध दिल्ली मॅचवर सट्टा; उल्हासनगरमधून तिघाना अटक
उल्हासनगर- कॅम्प नं-३ थारासिंग दरबार परिसरातील महाबजाज व्हिला बंगल्यावर पोलिसांनी शनिवारी रात्री साडे सात वाजता धाड टाकली. यावेळी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटलच्या आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह लॅपटॉप, मोबाईल असा एकून १३ लाख ८१ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ हिराघाट थारासिंग दरबार परिसरातील महाबजाज व्हिला बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट मॅचमधील मुंबई इंडियन विरुद्ध दिल्ली कॅपिटल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी साडे सात वाजता धाड टाकून धर्मेंद्र बजाज, राहुल बजाज व चिरंजीव आहुजा अशा तिघाना पोलिसांनी अटक केली. शनिवारी युएई मध्ये दुपारी साडे तीन ते सायंकाळी ७ पर्यंत खेळल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स क्रिकेट मॅचवर लॅपटॉप, मोबाईल फोन, ट्रान्समिशन मशीन, इंटरनेट राऊटर यांचा वापर करून लाईव्ह मॅचवर खेल खेल खेल या नावाच्या लेजर सॉफ्टवेअरमध्ये नोंदी करून स्वतःच्या फायद्यासाठी क्रिकेट बेटिंग जुगार खेळत असल्याचे उघड झाले.
क्रिकेट बेटिंग सट्टा प्रकरणाने खळबळ उडाली असून, असे क्रिकेट सट्टा शहरात राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. यापूर्वी क्रिकेट सट्ट्याचे माहेरघर म्हणून उल्हासनगरची ओळख होती. तेव्हा एका नगरसेवकासह अनेकांना अटक झाल्याने, शहराचे नाव बदनाम झाले होते. मात्र पुन्हा क्रिकेट सट्ट्याला ऊत आला असून पोलिसांनी वेळीच कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी क्रिकेट सट्टा प्रकरणी राहुल बजाज, धर्मेंद्र बजाज व चिरंजीवी आहुजा यांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल असा १३ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.