UP Crime: उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या प्रियकरासोबत संगनमत करून पतीची निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे, ही क्रूरता सुरू असताना आपल्या पित्याचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या पोटच्या मुलाला आईने बाबांना सुई टोचतोय तू इथून जा असे सांगून बाजूला केले. पोलिसांच्या तपासानंतर या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
मृत बलराम (वय ३०) हा आपली पत्नी पूजा आणि चार मुलांसह गावात राहत होता. तो मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र, दीड वर्षांपूर्वी पूजाचे प्रेमसंबंध बलरामच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा, म्हणजेच स्वतःच्या भाच्याशी जुळले. या अनैतिक संबंधांना घरातून विरोध होत होता, पण पूजा आणि आदेश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या वादातून ते तीन वेळा घर सोडून पळूनही गेले होते. बलरामने आपल्या कुटुंबासाठी पत्नीला माफ केले आणि तो तिला घटस्फोट न देता पुन्हा सोबत घेऊन आला, पण हेच त्याच्या जीवावर बेतले.
घटनेच्या दिवशी सकाळी बलरामचा भाऊ राजू त्याला कामावर बोलावण्यासाठी गेला असता, बलरामचा गळा चिरलेला मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पत्नी पूजा तिथेच बसून खोटा आक्रोश करत होती. तिने पोलिसांना सांगितले की, रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने हल्ला करून पतीला मारले. मात्र, पोलिसांना पूजावर संशय आल्याने त्यांनी बलरामचा मुलगा पवन याच्याकडे चौकशी केली. पवनने जो प्रसंग सांगितला तो ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली.
"रात्री बाबांच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी तिथे गेलो. तिथे आदेश आणि त्याचे दोन मित्र बाबांच्या गळ्यावर वार करत होते आणि मम्मीने त्यांचे पाय पकडले होते. मम्मीने मला पाहिलं आणि ओरडून सांगितलं की, इथून जा, पापांना सुई टोचली जात आहे. मी घाबरून पुन्हा खोलीत जाऊन झोपलो," असं पवन म्हणाला.
पतीने वाचवला संसार, पत्नीने घेतला जीव
बलरामच्या भावाने सांगितले की, त्याने अनेकदा बलरामला पूजापासून वेगळे होण्याचा सल्ला दिला होता. मात्र, चार मुलांच्या भविष्यासाठी आणि घरासाठी बलरामने पत्नीला सुधारण्याची संधी दिली होती. पण पूजेने आपल्या प्रियकरासह मिळून त्याचा बळी घेतला.
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी पूजा हिला ताब्यात घेण्यात आले असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पूजाचा प्रियकर आदेश सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील माहिती समोर येईल. एका चिमुरड्याने दिलेल्या साक्षीनं आपल्याच आईचं क्रूर रूप जगासमोर आणलं असून, या प्रकरणाची मोठी चर्चा होत आहे.
Web Summary : In Uttar Pradesh, a wife and her lover murdered her husband. The victim's son witnessed the crime, revealing his mother told him to leave, claiming his father was just getting a shot. Police arrested the wife; the lover is at large.
Web Summary : उत्तर प्रदेश में एक पत्नी ने प्रेमी संग मिलकर पति की हत्या कर दी। बेटे ने हत्या देखी और बताया कि मां ने उसे यह कहकर भगा दिया कि पिता को सुई लग रही है। पत्नी गिरफ्तार, प्रेमी फरार।