बेस्टच्या अध्यक्षांची विनाहेल्मेट बुलेटवारी; फेसबुकवर केले लाईव्ह पोस्ट   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 21:49 IST2018-08-13T21:47:11+5:302018-08-13T21:49:14+5:30

फेसबुकवर चक्क विनाहेल्मेट बुलेटवारी करत बेस्ट अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी लाईव्ह पोस्ट टाकली आहे. त्यामुळे त्यांना पाहून हेल्मेट कुठेय अशी चर्चा होताना दिसत आहे. 

Best President's has drive bulllet without helmet; Live post made on Facebook | बेस्टच्या अध्यक्षांची विनाहेल्मेट बुलेटवारी; फेसबुकवर केले लाईव्ह पोस्ट   

बेस्टच्या अध्यक्षांची विनाहेल्मेट बुलेटवारी; फेसबुकवर केले लाईव्ह पोस्ट   

मुंबई - अनेकदा वाहतूक पोलिस बाईकस्वारांना रॅश ड्राईव्हिंग करू नका, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवू नका असे संदेश देतात. मात्र वाहतुकीची नियम जर ''बेस्ट'' चे अध्यक्षच पायधुळी मिळवत असतील, तर सर्व सामान्यांकडून काय अपेक्षा करायची. फेसबुकवर चक्क विनाहेल्मेट बुलेटवारी करत बेस्ट अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी लाईव्ह पोस्ट टाकली आहे. त्यामुळे त्यांना पाहून हेल्मेट कुठेय अशी चर्चा होताना दिसत आहे. 

अपघातादरम्यान होणार मृत्यूचा धोका टाळण्यासाठी वाहतूक पोलीस अनेकदा जनजागृती करून हेल्मेट वापरास भाग पडतात. तर विनाहेल्मेट प्रवास करण्यास दंड देखील आकारतात. जर राजकारणी नियमांची पायमल्ली कर असेल तर मात्र, अशा राजकारण्यांकडून काय आदर्श घ्यायचा. कारण राजकारणी हा समाजाचा आरसा म्हणून संबोधिला जातो. त्यामुळे अनिल कोकीळ यांनी विनाहेल्मेट प्रवास करत तरुणांना विनाहेल्मेट प्रवास करण्यास प्रोत्साहित केल्यासारखे आहे.     

Web Title: Best President's has drive bulllet without helmet; Live post made on Facebook