सरकारी नोकरीचं स्वप्न दाखवून २५ कोटींचा गंडा; कपलने शेकडो तरुणांकडून घेतले लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:25 IST2026-03-23T13:24:33+5:302026-03-23T13:25:19+5:30

सरकारी नोकरीचं स्वप्न दाखवून कपलने शेकडो तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. 

benguluru court job scam 25 crore fraud pretext of government jobs hundred of youth looted charged 10 lakh for group d job | सरकारी नोकरीचं स्वप्न दाखवून २५ कोटींचा गंडा; कपलने शेकडो तरुणांकडून घेतले लाखो रुपये

सरकारी नोकरीचं स्वप्न दाखवून २५ कोटींचा गंडा; कपलने शेकडो तरुणांकडून घेतले लाखो रुपये

खासगी क्षेत्रातील नोकरीसाठी भारतातील तरुण बंगळुरूकडे धाव घेतात, याच दरम्यान बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 'ग्रुप डी'च्या सरकारी नोकरीसाठी काही तरुणांनी लाखो रुपये गमावल्याची घटना घडली आहे. सरकारी नोकरीचं स्वप्न दाखवून कपलने शेकडो तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. 

ग्रुप डी नोकरीसाठी प्रत्येकी १० लाख रुपये उकळणाऱ्या या कपलचं नाव जेसन डिसूझा आणि लवीना असं आहे. तरुणांच्या तक्रारीवरून सीसीबी (CCB) पोलिसांनी या मोठ्या फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश करत आरोपी पती-पत्नीला अटक केली आहे. हे कपल प्रामुख्याने बेरोजगार तरुण आणि खासगी कर्मचाऱ्यांना आपलं टार्गेट बनवत असत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कपल प्रत्येक तरुणाकडून न्यायालयात ग्रुप डी ची सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात १० लाख ते २५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम वसूल करत असे. खरं वाटावं यासाठी त्यांनी चक्क न्यायाधीशांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि बोगस नियुक्ती पत्रं तयार केली होती. कागदपत्र व्हेरिफिकेशनच्या बहाण्याने ते तरुणांना आलिशान हॉटेल्समध्ये बोलवायचे आणि त्यांना नोकरीचं खोटं ऑफर लेटर दाखवून त्यांचा विश्वास संपादन करायचे.

जेव्हा जेव्हा पीडित तरुण आपल्या नोकरीबद्दल चौकशी करायचे, तेव्हा हे कपल सुरुवातीला वेगवेगळी कारणं देऊन टाळाटाळ करायचे आणि नंतर त्यांचे फोन उचलणं बंद करायचे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर अनेकांनी सीसीबीकडे धाव घेतली, त्यानंतर बसवेश्वरनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

धक्कादायक बाब म्हणजे, या कपलने लोकांची फसवणूक करण्यासाठी एजंटचं एक मोठं जाळं तयार केलं होतं. हे एजंट गरजू तरुणांना शोधून त्यांना जाळ्यात ओढण्यास मदत करायचे. तरुणांकडून पैसे वसूल केल्यानंतर एजंट स्वतःचं कमिशन कापून घ्यायचे आणि उर्वरित रक्कम या कपलकडे सोपवत असत. सध्या सीसीबी पोलीस या आरोपींची सखोल चौकशी करत असून या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title : सरकारी नौकरी का झांसा देकर दंपत्ति ने युवाओं से लूटे करोड़ों रुपए।

Web Summary : बेंगलुरु में जेसन डिसूजा और लवीना नामक एक दंपति को सरकारी नौकरी का वादा करके सैकड़ों बेरोजगार युवाओं को ठगने के आरोप में गिरफ्तार किया गया है। उन्होंने जाली दस्तावेजों और हस्ताक्षरों का उपयोग करके पीड़ितों को धोखा दिया और अपनी धोखाधड़ी योजना के माध्यम से ₹25 करोड़ जमा किए।

Web Title : Couple swindles youth with fake government job promises, amassing crores.

Web Summary : A couple in Bangalore, Jaison D'Souza and Lavina, have been arrested for scamming hundreds of unemployed youth by promising government jobs for ₹10-25 lakhs. They used fake documents and signatures to deceive victims, amassing ₹25 crores through their fraudulent scheme.