शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

सीक्रेट लग्न, ८० लाखांचं पॅकेज... AI मुळे नोकरी गेलेल्या इंजिनिअरने संपवलं जीवन, पत्नीनेही केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:49 IST

एकाच घरात, अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने एका आयटी कपलने आपलं जीवन संपवलं.

बंगळुरूच्या कोथनूर परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. एकाच घरात, अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने एका आयटी कपलने आपलं जीवन संपवलं. ३२ वर्षीय रेड्डी यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी त्यांच्या फ्लॅटमधील बंद खोलीत आढळला आणि त्यानंतर काही वेळातच त्यांची पत्नी शाझिया सिराज हिने त्याच इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शाझिया सकाळी ७:३० च्या सुमारास नाईट शिफ्ट संपवून घरी परतली होती. घरी पोहोचल्यावर तिला अस्वस्थ वाटलं, कारण पती खोलीतून कोणताही प्रतिसाद देत नव्हता. घाबरलेल्या शाझियाने सुरक्षा रक्षकाला बोलावलं आणि बेडरुम आतून बंद असल्याचं सांगितलं. जेव्हा दरवाजा तोडला गेला, तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. रेड्डी यांचा मृतदेह खोलीत पडला होता आणि जवळच एक सुसाईड नोट सापडली. 

शाझिया सुमारे २० मिनिटं तिथेच होती, आजूबाजूला गर्दी जमा होऊ लागली होती आणि एकच गोंधळ उडाला होता. मात्र याच दरम्यान ती शांतपणे तिथून बाहेर पडली, लिफ्टने थेट १८ व्या मजल्यावर पोहोचली आणि तिथून खाली उडी मारली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये रेड्डी यांनी आपली नोकरी गेल्याचा आणि वाढत्या मानसिक तणावाचा उल्लेख केला आहे. एकेकाळी अमेरिकेत वर्षाला सुमारे ८० लाख रुपये कमावणाऱ्या रेड्डी यांचं आयुष्य अचानक बदललं होतं. AI मुळे नोकरी गेल्याने ते पूर्णपणे खचले होते आणि नवीन नोकरी मिळत नसल्याने त्यांचा स्ट्रेस सतत वाढत होता. 

अडीच वर्षांपूर्वी लग्न केलेल्या या कपलने आपलं लग्न खूप सीक्रेट ठेवलं होतं. रेड्डी यांच्या कुटुंबाला लग्नाची माहिती होती, परंतु शाझियाच्या कुटुंबाला याची अजिबात कल्पना नव्हती. याच कारणामुळे त्यांना सुरुवातीला हैदराबादमध्ये अडचणींचा सामना करावा लागला आणि सुमारे ८ महिन्यांपूर्वी ते बंगळुरूला शिफ्ट झाले होते, जिथे शाझिया आयबीएम (IBM) मध्ये कार्यरत होती. रविवार रात्री दोघांचं शेवटचं फोनवर बोलणं झालं होतं, ज्यात रेड्डी यांनी जेवण ऑर्डर केल्याचं आणि लवकरच जेवणार असल्याचं सांगितलं होतं. 

English
हिंदी सारांश
Web Title : AI Job Loss Leads to IT Couple's Tragic Suicide

Web Summary : Bengaluru couple, an IT engineer and his wife, tragically committed suicide. Job loss due to AI and resulting stress drove the husband to end his life, prompting his wife to also take the extreme step.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूरDeathमृत्यूPoliceपोलिस