नवऱ्यासाठी सोडली मोठ्या पगाराची नोकरी, त्यानेच केला विश्वासघात; गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहाथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:42 IST2026-01-13T12:41:23+5:302026-01-13T12:42:20+5:30
एका आयटी कर्मचाऱ्याला पत्नीची फसवणूक, मारहाण आणि छळाच्या आरोपाखाली अटक केली आहे.

फोटो - आजतक
बंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी परिसरात पोलिसांनी एका आयटी कर्मचाऱ्याला पत्नीची फसवणूक, मारहाण आणि छळाच्या आरोपाखाली अटक केली आहे. पत्नीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलीस तपासात पीडित पत्नी आणि आरोपी पती यांच्यातील संघर्षाची एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होती आणि तिला चांगला पगार मिळत होता. मात्र आपल्या बेरोजगार पतीला नोकरी मिळावी आणि त्याला मदत व्हावी, यासाठी तिने स्वतःची नोकरी सोडली होती.
नोकरी सोडल्यानंतर पत्नीने केवळ घरच सांभाळलं नाही, तर आपल्या पतीला एका मोठ्या टेक कंपनीत नोकरी मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. पतीला नोकरी लागल्यानंतर आणि मुलाच्या जन्मानंतर आरोपी पती जैकब अरूप याचं वागणं पूर्णपणे बदललं. आरोपी आपल्या पत्नीला तिच्या जातीवरून अश्लील शिवीगाळ करायचा आणि तिचा मानसिक छळ करायचा.
पत्नीचा आरोप असा आहे की, मारहाण इतकी गंभीर होती की तिचा गर्भपात झाला. आरोपीचे इलेक्ट्रॉनिक सिटी परिसरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, जिच्यासोबत तो वारंवार वेळ घालवायचा. पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे अत्याचार आणि मारहाणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला त्याच्या प्रेयसीच्या घरातून अटक केली.