कर्जाच्या विळख्यात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; पोटच्या मुलानेच आई, बहीण, भाच्याचा गळा चिरला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 11:12 IST2026-03-29T11:12:15+5:302026-03-29T11:12:39+5:30

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका तरुणाने आपल्याच कुटुंबातील तीन सदस्यांचा गळा चिरल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

bengaluru family end life in anekal two dead and two critical after debt crisis | कर्जाच्या विळख्यात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; पोटच्या मुलानेच आई, बहीण, भाच्याचा गळा चिरला अन्...

कर्जाच्या विळख्यात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; पोटच्या मुलानेच आई, बहीण, भाच्याचा गळा चिरला अन्...

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका तरुणाने आपल्याच कुटुंबातील तीन सदस्यांचा गळा चिरल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या भीषण कृत्यानंतर त्याने स्वतः देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्याची आई आणि बहिणीचा मृत्यू झाला असून, तो स्वतः आणि त्याचा भाचा सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. आशा (५५) आणि त्यांची मुलगी वर्षिता (३४) अशी मृतांची नावे आहेत. मोहन गौडा (३२) आणि वर्षिता यांचा मुलगा मयंक (११) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बंगळुरूच्या बाहेरील भागातील अनेकल तालुक्यातील अत्तिबेले जवळील मल्लेनाहल्ली येथील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहनने आपली आई, बहीण आणि भाच्याचा गळा चिरला आणि त्यानंतर स्वतःचाही गळा चिरून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना उघडकीस येण्यापूर्वी या कुटुंबाने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे आपण हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. 

हा व्हिडीओ त्यांनी नातेवाईकांना पाठवला होता, तो पाहताच नातेवाईक तातडीने त्यांच्या घराच्या दिशेने धावले. नातेवाईक घरी पोहोचले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. अखेर त्यांनी मागच्या दरवाजाने घरात प्रवेश केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी आई आणि बहिणीला मृत घोषित केले.

बंगळुरू ग्रामीणचे एसपी चंद्रकांत एम.व्ही. यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात आर्थिक टंचाई आणि कर्जाच्या ओझ्यामुळे हे पाऊल उचलल्याचं दिसून येत आहे. मोहन चिटफंडच्या व्यवसायाशी संबंधित होता, ज्यामध्ये तो ५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतचे व्यवहार करत असे. मोहन खूप पैसे उधळायचा, ज्यामुळे तो कर्जामध्ये अडकत गेला. जेव्हा कर्ज फेडणं अशक्य झाले, तेव्हा त्याने कुटुंबासह जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. पोलीस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Web Title : कर्ज में डूबा परिवार: बेटे ने माँ, बहन, भांजे की हत्या की।

Web Summary : बेंगलुरु में कर्ज के कारण एक व्यक्ति ने अपनी माँ, बहन और भांजे की हत्या कर दी। माँ और बहन की मौत हो गई; वह और उसका भांजा गंभीर रूप से घायल हैं। रिश्तेदारों को भेजे गए एक वीडियो संदेश में वित्तीय संकट का खुलासा हुआ।

Web Title : Family Annihilated by Debt: Son Murders Mother, Sister, Nephew.

Web Summary : In Bengaluru, a man killed his mother, sister, and nephew due to debt. The mother and sister died; he and his nephew are critically injured. Financial struggles drove the horrific act, revealed in a video message to relatives before the incident.