Abhishek Ghosalkar Murder FB Live वेळी मी दरवाजा उघडला, मला बाहेर काढलं अन्...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 10:40 AM2024-02-09T10:40:55+5:302024-02-09T12:02:31+5:30

Before the murder of Abhishek Ghosalkar, Lalchand Pal himself was with him. He has told what exactly happened अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी लालचंद पाल हे स्वत: त्यांच्यासोबत होते.

Before the murder of Abhishek Ghosalkar Lalchand Pal himself was with him He has told what exactly happened | Abhishek Ghosalkar Murder FB Live वेळी मी दरवाजा उघडला, मला बाहेर काढलं अन्...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना

Abhishek Ghosalkar Murder FB Live वेळी मी दरवाजा उघडला, मला बाहेर काढलं अन्...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना

फेसबुक लाईव्हदरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाईच्या कार्यालयातच पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याने मुंबई हादरली. घोसाळकरांच्या हत्येपाठोपाठ मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांसह गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. 

आज सकाळी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे.  मेहुल पारीख आणि रोहित साहू असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं आहेत. विशेष म्हणजे गोळीबार जेव्हा झाला त्यावेळी मेहुल पारीख देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जात असून, तसा उल्लेख फेसबुक लाईव्हमध्ये घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हा याने केला होता. मेहुल पारीखच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची देखील शक्यता आहे. 

प्रत्यक्षदर्शींनं काय सांगितलं?

अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी लालचंद पाल हे स्वत: त्यांच्यासोबत होते. गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळीच असलेल्या पाल यांनी तिथे नेमकं काय झालं? तो थरारक अनुभव सांगितला. 'एका मराठी वृत्तवाहिनी'शी बोलताना लालचंद पाल म्हणाले की, काल सकाळी अकरा वाजता अभिषेक घोसाळकर यांना मॉरिसचा फोन आला की, संध्याकाळी महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम आहे. पण साडी वाटण्याआधी, मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना फेसबुक लाईव्ह करण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये नेले. मी त्यांच्यासोबत होतो. मॉरिसच्या कार्यालयात दोघंही बोलत होते. 

मी खूप वेळ झाल्यामुळे दरवाजा उघडूनमध्ये गेलो, तेव्हा दोघं मोबाईलद्वारे फेसबुक लाईव्ह करत होते. मी गेल्यावर थोड्यावेळाने आम्ही येतो, असं बोलून मॉरिसने मला बाहेर काढलं, असं लालचंद पाल यांनी सांगितले. त्यानंतर बंदुकीच्या गोळीचा आवाज आला आणि मी आत धावलो, तर अभिषेक हे खाली पडला होता आणि मॉरिस त्याच्यावर गोळीबार करत होता. बंदुकीतील गोळ्या संपल्यानंतर सुद्धा मॉरिस सतत अभिषेक यांच्यावर गोळीबार करत होता, असं लालचंद पाल यांनी म्हणाले. मॉरिस आणि अभिषेकमध्ये आधीच वाद झाला होता, तो संपवण्यासाठी ख्रिसमसच्या वेळी मॉरिसने अभिषेक यांचे बॅनर पोस्टर लावून जवळीक वाढवल्याची माहिती समोर आली आहे. 

अत्याचाराचा गुन्हा 

मॉरिसविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. सध्या तो जामिनावर होता. लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार करण्यामागे अभिषेकचा हात असल्याचा संशय मॉरिसला होता. त्या रागातून हा प्रकार घडल्याचेही बोलले जाते. काही दिवस न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर त्याला कोर्टाने जामीन मंजूर केला होता.

कोण आहेत अभिषेक घोसाळकर?

माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा असलेले अभिषेक दोन वेळा दहिसर कांदरपाडा ७ येथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मुंबई बँकेच्या संचालकपदीही ते कार्यरत होते.

Read in English

Web Title: Before the murder of Abhishek Ghosalkar Lalchand Pal himself was with him He has told what exactly happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.