फादर्स डेच्या आधी मुलाने वडिलांचा चाकू भोसकून घेतला जीव, जाणून घ्या काय होतं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 14:51 IST2022-06-20T14:48:07+5:302022-06-20T14:51:42+5:30

Murder Case : पैशाच्या व्यवहारावरून नराधम  मुलाने आपल्याच वडिलांचा चाकू भोसकून खून केला.

Before Father's Day, the boy murdered his father | फादर्स डेच्या आधी मुलाने वडिलांचा चाकू भोसकून घेतला जीव, जाणून घ्या काय होतं कारण

फादर्स डेच्या आधी मुलाने वडिलांचा चाकू भोसकून घेतला जीव, जाणून घ्या काय होतं कारण

बिकानेर : संपूर्ण जग रविवार, १९ जून रोजी फादर्स डे साजरा करत होतं. वडिलांवर प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून ओसंडून वाहत होतं. मात्र, बिकानेरच्या नया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पितापुत्राच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पैशाच्या व्यवहारावरून नराधम  मुलाने आपल्याच वडिलांचा चाकू भोसकून खून केला.

मुलाने वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घटना नया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वोदय बस्तीची आहे. काल रात्री अकराच्या सुमारास सर्वोदय बस्ती, मनोज दाल मिलच्या मागे राहणाऱ्या अशोक मेघवाल याने वडील रामचंद्र यांच्या पोटात वार केले. इतर नातेवाईकांनी जखमी रामचंद्रला रुग्णालयात नेले. मात्र, वाटेतच वडिलांचा मृत्यू झाला. आरोपी अशोकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय म्हणाले डीवायएसपी दीपचंद सहारन?
डीवायएसपी दीपचंद सहारन यांनी सांगितले की, मृताचा दुसरा मुलगा शंकर याने अशोकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शंकरच्या म्हणण्यानुसार अशोकने इशानकडून पैसे उसने घेतले होते. या प्रकरणावरून मृत रामचंद्र याने इशानला दोन-तीन वेळा चपराक मारली होती.

रात्री रामचंद्रने अशोकला ठिकाणाहून कर्ज घेऊ नको, असे सांगितले. तसेच त्याला व्यवसाय करण्यास सांगितले होते. यावर अशोकने वडील रामचंद्र यांच्यावर चाकूने वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी दोघेही दारूच्या नशेत होते.

 

Web Title: Before Father's Day, the boy murdered his father