शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

'केबीसी'ची लखपती बनायला गेली अन् पैसेच गमवून बसली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 4:40 PM

फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देकांदिवलीत राहणाऱ्या अमरुनिसा अब्दुल कलाम शेख (२५) यांची यात फसवणूक झाली आहे. शेख यांनी पैसे नसल्याचे सांगताच, त्यांनी बोलण्यात गुंतवून त्यांना अर्धे पैसे भरण्यास सांगितले.

मुंबई - लखपती होण्याच्या नादात गृहिणीने ८३ हजार रुपये गमावल्याची घटना कांदिवलीत उघडकीस आली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.कांदिवलीत राहणाऱ्या अमरुनिसा अब्दुल कलाम शेख (२५) यांची यात फसवणूक झाली आहे. त्यांच्या मोबाइलमध्ये असलेल्या आयएमओ अ‍ॅपवर केबीसी ऑफिसर नावाने कॉल आला. संबंधित कॉल धारकाने त्यांना ३५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून आधार कार्ड, पॅन कार्ड पाठविण्यास सांगितले. शेख यांचाही त्याच्यावर विश्वास बसला. सावज जाळयात अडकल्याचे लक्षात येताच, प्रोसेसिंग फीज म्हणून १८ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून पैसे भरले. पुढे २५ हजार रुपये कराची रक्कम भरल्यानंतर खात्यात पैसे जमा होतील, असे सांगितले. तेही पैसे त्यांनीही भरले. त्यानंतर, त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या नावाने कॉल आला. त्याने लॉटरीच्या कागदपत्रांवर दोन प्रकारे सह्या कराव्या लागतात. एकात पैसे कट होतात, तर एकात होत नाहीत, असे सांगत आणखीन १ लाख भरण्यास सांगितले. शेख यांनी पैसे नसल्याचे सांगताच, त्यांनी बोलण्यात गुंतवून त्यांना अर्धे पैसे भरण्यास सांगितले. अशा प्रकारे त्यांनी एकूण ८३ हजार लॉटरीच्या नादात जमा केले. मात्र, यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख यांनी कांदिवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसMONEYपैसाCrime Newsगुन्हेगारीKaun Banega Crorepatiकौन बनेगा करोडपती