कॉलर खेचत वाहतूक पोलिसाला तृतीयपंथीयाने केली मारहाण; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 04:07 PM2021-09-21T16:07:22+5:302021-09-21T16:15:15+5:30

Beating traffic police in Mumbai : तृतीयपंथी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून अधीक तपास सुरू आहे.

Beating traffic police by pulling a collar by transgender; Three arrested by Bangurnagar police | कॉलर खेचत वाहतूक पोलिसाला तृतीयपंथीयाने केली मारहाण; तिघांना अटक

कॉलर खेचत वाहतूक पोलिसाला तृतीयपंथीयाने केली मारहाण; तिघांना अटक

Next
ठळक मुद्देतृतीयपंथी रिक्षात बसून निघाल्यानंतर त्याच रिक्षाची एका पादचाऱ्याला धडक बसली. हा सगळा प्रकार कैद झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मुंबई - ट्राफिक पोलिसाची कॉलर पकडत त्याला मारहाण करणाऱ्या तृतीयपंथीयासह तिघांना बांगुरनगर पोलिसांनीअटक केली. हा प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सदर तृतीयपंथी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून अधीक तपास सुरू आहे.

गोरेगावमध्ये बांगुरनगर पोलिसांच्या हद्दीत शनिवारी हा प्रकार घडला होता. तृतीयपंथी रिक्षात बसून निघाल्यानंतर त्याच रिक्षाची एका पादचाऱ्याला धडक बसली. तेव्हा त्याने चालकाशी वाद घालण्यास सुरवात केली. हा प्रकार वाहतूक पोलिसाने पाहिला आणि ते  पादचाऱ्याच्या बचावासाठी गेले. तेव्हा तृतीयपंथीयाने त्यांची कॉलर पकडत त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार कैद झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानुसार बांगुरनगर पोलिसांनी त्याचा शोध घेत तिघांना अटक केली. यात मुख्य मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव मार्शल असून तो अभिलेखावरील गुन्हेगार आहे.

Web Title: Beating traffic police by pulling a collar by transgender; Three arrested by Bangurnagar police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.