गाडीची हवा सोडल्याच्या कारणावरुन दोघा भावांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 16:02 IST2019-03-18T16:00:44+5:302019-03-18T16:02:19+5:30

गाडीची हवा सोडल्याच्या कारणावरुन तिघांनी दोघा भावांना बेदम मारहाण केली.

beaten to Two brothers due to leave vehicle air | गाडीची हवा सोडल्याच्या कारणावरुन दोघा भावांना मारहाण

गाडीची हवा सोडल्याच्या कारणावरुन दोघा भावांना मारहाण

पिंपरी : गाडीची हवा सोडल्याच्या कारणावरुन तिघांनी दोघा भावांना बेदम मारहाण केली. ही घटना दापोडीतील वरची आळी येथे रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. युवराज काळे (श्री स्वामी समर्थ अपार्टमेंट, वरची आळी, दापोडी) पप्पु देवकाते, मनोज बारटक्के (दोघेही रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी किरण मच्छिंद्र बोराडे (वय २९, रा. विठ्ठल मंदीराशेजारी, वरची आळी, दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी दुपारी किरण बोराडे व त्यांचा भाऊ कमलेश हे घरी असताना आरोपी बोराडे यांच्या घरात शिरले. माझ्या गाडीची हवा का सोडली असे म्हणत फिर्यादी बोराडे यांना शिवीगाळ करत त्यांच्या तोंडावर, कपाळावर मारहाण केली. तसेच कमलेश यांना देखील मारहाण करत तुमच्याकडे बघून घेतो अशी धमकी दिली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: beaten to Two brothers due to leave vehicle air