भोसरीत मित्राच्या मदतीने ‘दाजी’लाच ठोकले ; दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 15:55 IST2019-03-11T15:51:13+5:302019-03-11T15:55:45+5:30

पती-पत्नीच्या किरकोळ भांडणावरुन मेहुण्याने मित्राच्या मदतीने दाजीला बेदम मारहाण केली.

beaten to 'Daji' by Both person in Bhosari | भोसरीत मित्राच्या मदतीने ‘दाजी’लाच ठोकले ; दोघांना अटक 

भोसरीत मित्राच्या मदतीने ‘दाजी’लाच ठोकले ; दोघांना अटक 

पिंपरी : पती-पत्नीच्या किरकोळ भांडणावरुन मेहुण्याने मित्राच्या मदतीने दाजीला बेदम मारहाण केली. ही घटना भोसरीतील इंद्रायणीनगर येथे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. राहुल कन्हैया लालबेक (रा. घोरपडीगाव, रेल्वे वसाहत), अमित विजयसिंग पारसा (रा. ताडीवाला रोड, साईबाबा मंदीराशेजारी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दिपक भरत परमार (वय ३७, रा. सेक्टर क्रमांक २, बसथांब्याजवळ, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी दुपारी दिपक परमार व त्यांची पत्नी यांच्यात किरकोळ भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन फियार्दीच्या पत्नीचा भाऊ राहुल लालबेक व त्याचा मित्र अमित पारसा यांनी परमार यांना शिवीगाळ करत प्लॅस्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Web Title: beaten to 'Daji' by Both person in Bhosari