शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

लैंगिक अत्याचार प्रकरणी तक्रार करण्यास मदत केल्याने गुन्हेगाराच्या गुंडांनी केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 3:00 PM

खराडी येथील घटना, हाताचे हाड केले फ्रॅक्चर

ठळक मुद्देयाप्रकरणी चंदननगर पोलिसांकडे दिली फिर्याद

पुणे : शिक्रापूर येथे झालेल्या मुलीवरील लैगिक अत्याचाराच्या घटनेत तक्रार करण्यास मदत केल्याच्या रागातून सराईत गुन्हेगाराच्या गुंडांनी तरुणाला मारहाण करुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना खराडी येथील एशियन पेंट शॉपच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली आहे. याप्रकरणी सचिन गणेश सातव (वय ३८, रा. वाघोली) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या घटनेत सातव यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातव यांच्या मित्राच्या मुलीवर दीपक ठोंबरे (रा़ वाघोली) याने लैंगिक अत्याचार केला. त्यावरुन शिक्रापूर पोलिसांनी ठोंबरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्या अनुषंगाने पाषाण येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी सचिन सातव यांनी मित्राला मदत केली होती . या प्रकारानंतर २५ सप्टेंबरला सचिन सातव हे घरी जात असताना चार अनोळखी लोकांनी त्यांना अडवत शिवीगाळ केली.  मुलीच्या प्रकरणात लय लक्ष घालतो काय ठोका असे बोलून लोखंडी रॉडने सातव यांच्या हातावर, पायावर, बरगड्यांवर व पायाच्या नडगीवर दगडाने मारहाण केली़ त्यात सातव हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या हाताचे हाड फॅक्चर झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ उपचार घेतल्यानंतर त्यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दीपक ठोंबरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस