धक्कादायक! ८ वर्षांच्या मुलाची लोकांना भीती; सायकल चोरीचा 'मास्टरमाइंड', पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:02 IST2025-05-31T12:59:40+5:302025-05-31T13:02:30+5:30

एका ८ वर्षांच्या मुलाने चोरांच्या गँगलाही मागे टाकलं आहे. अवघ्या काही मिनिटांत शक्कल लढवून सायकल गायब करणाऱ्या या छोट्या चोराचे कारनामे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

basti eight year old thief kid become mastermind of stealing bicycle | धक्कादायक! ८ वर्षांच्या मुलाची लोकांना भीती; सायकल चोरीचा 'मास्टरमाइंड', पोलीसही हैराण

धक्कादायक! ८ वर्षांच्या मुलाची लोकांना भीती; सायकल चोरीचा 'मास्टरमाइंड', पोलीसही हैराण

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ८ वर्षांच्या मुलाने चोरांच्या गँगलाही मागे टाकलं आहे. अवघ्या काही मिनिटांत शक्कल लढवून सायकल गायब करणाऱ्या या छोट्या चोराचे कारनामे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ज्याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या आठ वर्षांच्या चोरामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

बस्ती शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील आवास विकास मोहल्ला येथे एका ८ वर्षांच्या चोराने दहशत निर्माण केली आहे. हा मुलगा त्याच्या वयापेक्षा खूपच धूर्त पद्धतीने एकामागून एक सायकल चोरत आहे. त्याच्या कारनाम्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामुळे लोकांना मोठा धक्का बसला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हा मुलगा अतिशय हुशारीने त्याचं प्लॅनिगं करताना दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये, तो मुलगा आरामात घरात प्रवेश करतो आणि क्षणार्धात सायकल घेऊन घरातून पळून जातो. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो मुलगा सायकलचं कुलूप तोडतो आणि सहजपणे ती घेऊन निघून जातो. 

या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता घरांबाहेर पार्क केलेल्या सायकल देखील आत ठेवल्या जात आहेत. अनेक लोकांनी त्यांच्या सायकलना मजबूत कुलूप लावण्यास सुरुवात केली आहे. बस्ती पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि तपास सुरू केला आहे. पोलीस या मुलाचा शोध घेत आहेत.
 

Web Title: basti eight year old thief kid become mastermind of stealing bicycle