Bareilly Muslim Girl:मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी केले लग्न; आता झाला जीवाला धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 21:44 IST2022-05-24T20:45:24+5:302022-05-24T21:44:51+5:30
Bareilly Muslim Girl: तिने एक व्हिडिओ व्हायरल केला आहे, ज्यामध्ये आरोही म्हणत आहे की, तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की, आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका. त्याचवेळी ती तिच्या काकांना जीवे मारण्याचा प्रयत्न याबाबत बोलत आहे.

Bareilly Muslim Girl:मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी केले लग्न; आता झाला जीवाला धोका
बरेली : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका मुस्लिम मुलीने धर्म बदलून हिंदू मुलगा बॉबीशी लग्न केले. लुबना नाव बदलून आरोही बनलेल्या या मुलीच्या जीवाला आता धोका उत्पन्न झाला आहे. तिने एक व्हिडिओ व्हायरल केला आहे, ज्यामध्ये आरोही म्हणत आहे की, तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की, आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका. त्याचवेळी ती तिच्या काकांना जीवे मारण्याचा प्रयत्न याबाबत बोलत आहे.
हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी दोघेही एकाच परिसरात राहतात. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांत प्रेमसंबंध आहेत. 20 मे रोजी दुपारी दोघेही घराबाहेर पडले आणि दोघांनी मंदिरात हिंदू विधीनुसार लग्न केले. लुबनापासून आरोही बनलेली मुलगी म्हणते की, तिला मुस्लिम धर्म आवडत नाही. मुस्लिम धर्मात तिहेरी तलाक आणि हलाला आहे. तिने बुरखा आणि हिजाब सोडला आहे. आरोहीने तिच्या कुटुंबीयांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओ व्हायरल करून तिने पोलिस-प्रशासनाकडे आपल्या आणि पतीच्या जीवाच्या सुरक्षेचे आवाहन केले आहे.
त्याचवेळी बॉबीने सांगितले की, आरोहीच्या कुटुंबीयांकडून आपल्या कुटुंबाचा छळ केला जात आहे. त्याचवेळी आरोही आणि बॉबीचे लग्न लावून दिलेल्या पंडिताने आपल्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले आहे. तो म्हणाला की, जेव्हा दोघेही माझ्याकडे आले तेव्हा मी पाहिले की दोघेही प्रौढ आहेत आणि त्यांना स्वतःच्या इच्छेने लग्न करायचे आहे. त्यावर आम्ही दोघांनी आर्य समाजाच्या रीतीरिवाजानुसार लग्न केले आहे.