शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

ग्राहकांच्या खिशातून मोबाईल लांबवणाऱ्या 'थैली गँग'चा पर्दाफाश! चोरीचे तब्बल १५ मोबाईल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 21:09 IST

ग्राहकांच्या खिशातून मोबाईल लांबवणार्‍या झारखंडच्या 'थैली गँग'चा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

जळगाव : जळगावसह अकोला, नाशिक, खामगाव, भुसावळ येथील भाजी बाजारात फिरून ग्राहकांच्या खिशातून मोबाईल लांबवणार्‍या झारखंडच्या 'थैली गँग'चा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दरम्यान, पोलिसांनी थैली गँगच्या दोन अल्पवयीन मुलांसह तुफान रघू रिखीयासन (३०, रा. पुरानाभट्टागाव, जि.साहेबगंज, झारखंड) व बारिश अर्जुन महतो (३५, रा. महाराजपुर नया टोला कल्याणी जि. साहेबगंज झारखंड) यांना अकोला येथून अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल चोरीचे १५ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

दादावाडी येथील लखीचंद वामन बडगुजर हे शुक्रवारी मोबाईल दुरुस्त करण्यासाठी सोमाणी मार्केटमध्ये जात होते. पिंप्राळा बाजार रस्त्यावर चार अनोळखी युवकांनी बडगुजर थांबवून त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातून मोबाईल हिसकाविला होता. मात्र, बडगुजर यांनी आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीन जणांना पाठलाग करून पकडले होते. पण, एक पसार झाला होता. तिघांना रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी तिघांची कसून चौकशी केली. नंतर पळून गेलेला साथीदार हा अकोला येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अकोला गाठून तुफान रघू सिखीयासन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यानंतर त्याने टोळीतील दुसरा साथीदार बारिश अर्जुन महतो या संशयिताच्या शेगाव येथून ताब्यात घेतले. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता तेथून १३ महागडे मोबाईल जप्त करण्यात आले.

पिशविचा आधारघेत अलगद काढायचे मोबाईल...झारखंडच्या या थैली गँगने जळगावसह अकोला, नाशिक, खामगाव, भुसावळ या ठिकाणाहून देखील मोठ्या प्रमाणात मोबाईल लांबविले असून त्यांची टोळी अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रीय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. गावातील बाजारांमध्ये झारखंडची थैली गँग हातात पिशवी घेवून शिरत होती. गर्दीचा फायदा घेवून ते अल्पवयीन मुलांच्या मदतीने ग्राहकाच्या खिशाजवळ हातातील पिशवी घेवून जात अलगद मोबाईल काढून घेत तेथून पोबारा करीत होते. या गँगने संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घातला होता. त्यांच्याकडून आणखी काही मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

यांनी केली कारवाईही कामगिरी रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहीदास गभाले, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, संजय सपकाळे, सुशिल चौधरी, रेवानंद साळुंखे, राजेश चव्हाण, विजय खैरे, चंद्रकात पाटील, अतुल चौधरी, रविंद्र चौधरी, उमेश पवार, अनिल सोननी, दीपक वंजारी यांच्या पथकाने केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलPoliceपोलिस