In the backdrop of the Lok Sabha elections, 11 crore of the money seized from Mumbai | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून ११ कोटींची रक्कम जप्त 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून ११ कोटींची रक्कम जप्त 

मुंबई - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून आतापर्यंत १० कोटी ५१ लाख रुपयाची रोकड़ जप्त करण्यात आली असून  आयकर विभागाक़डून तपासणी सुरु आहे. आचारसंहिता उल्लंघन क़ेल्याप्रकरणी १७ गुन्हे दाखल दाखल असून ३९१ अवैध शस्त्र पोलिसांनी जप्त केली आहेत. एनडीपीएस कायद्यांतर्गत ५१० प्रकरणे नोंदविली गेली असून १० लाख ३९ हजार ८९४ रुपयांची २६४८ लिटर बेकायदेशीर दारू ताब्यात घेण्यात आली आहे. तर ऐकून १८७ प्रकरणांची नोंद करून ४०, ८२, ५८६, ९५५ रुपयांचे अवैध मादक द्रव्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. 

तसेच दहशतवाद विरोधी उपाययोजना म्हणून श्रीलंकेतील अलीकडील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा वाढविली आहे  आणि फोर्स वन, क्यूआरटी, असॉल्ट टीम, दहशतवाद विरोधी पथक इत्यादींना आवश्यकता सूचना देण्यात आल्या आहेत. इंटलिजन्ट टीम देखील कार्यरत आहे. 


Web Title: In the backdrop of the Lok Sabha elections, 11 crore of the money seized from Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.