लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून ११ कोटींची रक्कम जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 21:06 IST2019-04-27T21:05:30+5:302019-04-27T21:06:14+5:30
फोर्स वन, क्यूआरटी, असॉल्ट टीम, दहशतवाद विरोधी पथक इत्यादींना आवश्यकता सूचना देण्यात आल्या आहेत. इंटलिजन्ट टीम देखील कार्यरत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून ११ कोटींची रक्कम जप्त
मुंबई - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून आतापर्यंत १० कोटी ५१ लाख रुपयाची रोकड़ जप्त करण्यात आली असून आयकर विभागाक़डून तपासणी सुरु आहे. आचारसंहिता उल्लंघन क़ेल्याप्रकरणी १७ गुन्हे दाखल दाखल असून ३९१ अवैध शस्त्र पोलिसांनी जप्त केली आहेत. एनडीपीएस कायद्यांतर्गत ५१० प्रकरणे नोंदविली गेली असून १० लाख ३९ हजार ८९४ रुपयांची २६४८ लिटर बेकायदेशीर दारू ताब्यात घेण्यात आली आहे. तर ऐकून १८७ प्रकरणांची नोंद करून ४०, ८२, ५८६, ९५५ रुपयांचे अवैध मादक द्रव्य पोलिसांनी हस्तगत केले आहे.
तसेच दहशतवाद विरोधी उपाययोजना म्हणून श्रीलंकेतील अलीकडील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा वाढविली आहे आणि फोर्स वन, क्यूआरटी, असॉल्ट टीम, दहशतवाद विरोधी पथक इत्यादींना आवश्यकता सूचना देण्यात आल्या आहेत. इंटलिजन्ट टीम देखील कार्यरत आहे.
मुंबई - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून आतापर्यंत १० कोटी ५१ लाख रुपयाची रोकड़ जप्त, आयकर विभागाक़डून तपासणी सुरु,आचारसंहिता उल्लंघन क़ेल्याप्रकरणी १७ गुन्हे दाखल, ३९१ अवैध शस्त्र जप्त
— Lokmat (@MiLOKMAT) April 27, 2019