"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 13:59 IST2025-10-02T13:58:34+5:302025-10-02T13:59:19+5:30
पोलिसांनी चैतन्यानंदच्या घराची झडती घेतली असता, तेथे एक सेक्स टॉय, पाच अश्लील सीडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबतचे बनावट फोटोही सापडले आहेत.

"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
दिल्ली पोलिसांनी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू तथा दिल्लीतील एका संस्थेचा माजी व्यवस्थापक स्वामी चैतन्यानंद याला अटक केली आहे. त्यांची अनेक काळी कृत्य समोर येत आहेत. त्यांच्यावर जवळपास 17 विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. रविवारी उत्तर प्रदेशातील आग्रा येथून त्याला अटक करण्यात आली. त्यांच्या मोबाइलमधील चॅट्समधून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थिनींकडे लैंगिक संबंधांची मागणी केल्याचे उघड झाले आहे. एका चॅटमध्ये तर त्यानी एका विद्यार्थिनीला चक्क ‘दुबईच्या शेखसाठी सेक्स पार्टनर’ मिळू शकेल का? असा प्रश्नही विचारला होता.
पोलिसांनी चैतन्यानंदच्या घराची झडती घेतली असता, तेथे एक सेक्स टॉय, पाच अश्लील सीडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबतचे बनावट फोटोही सापडले आहेत. महत्वाचे म्हणजे, त्यांच्या धार्मिक संघटनेने ऑगस्ट महिन्यातच आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली त्याची संस्थेतून हकालपट्टी केली होती. लैंगिक छळाचे आरोप समोर येण्यापूर्वीच ही घटना घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, त्यांच्या फोनमधील चॅट्समधून त्यांनी विद्यार्थिनींना ‘बेबी’, ‘स्वीटी बेबी डॉटर डॉल’ अशा शब्दांनी संबोधल्याचेही समोर आले आहे. एवढेच नाही तर, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका चॅटमध्ये त्याने एका विद्यार्थिनीला, 'You'll not sleep with me?' (तू माझ्यासोबत झोपणार नाही का?), असा थेट प्रश्न विचारल्याचेही समोर आले आहे.
आग्रा येथून अटक केल्यानंतर चैतन्यानंदला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून, गुरुवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस पीडितांचे जबाब आणि पुराव्यांचा मेळ घालत आहेत. पोलीस त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांच्या भूमिकांचाही तपास करत आहेत.