बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 15:14 IST2025-09-30T15:13:11+5:302025-09-30T15:14:32+5:30
Swami Chaitanyananda Saraswati Latest News: दिल्लीतील डर्टी बाबाचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत. स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांचे इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतही संबंध होते, असे तपासातून समोर आले.

बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
Swami Chaitanyananda Saraswati accused of Sexual Harassment: आश्रम वेब सीरिजमधील बाबा निरालाचे चाळे तुम्ही बघितले असतील. पण, दिल्लीतील स्वामी चैतन्यानंद सरस्वतीने बाबा निरालालाही मागे टाकले आहे. विद्यार्थिनींना धमक्या देऊन त्यांना संबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या बाबा चैतन्यानंद सरस्वतीचा मोबाईल अनेका कांडांचे पुरावे असलेली तिजोरीच ठरला आहे. स्वामी चैतन्यानंदचे इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत महिलासोबतच संबंध होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विद्यार्थिनीसह महिलांनाही शय्यासोबत करायला लावणाऱ्या स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला पोलिसांनी अटक केली आहे. स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या मोबाईलमध्ये अनेक फोटो आणि व्हिडीओ पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसांनी याच प्रकरणात रश्मी, काजल, श्वेता (नावे बदललेली) या चैतन्यानंदच्या तीन सख्ख्या बहिणींची चौकशी सुरू केली आहे.
दिल्ली पोलिसांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती याचा मोबाईल जप्त केला. त्यात अश्लील फोटो, अश्लील व्हिडीओ, महिला, मुलींसोबतचे संभाषणही मिळाले आहेत.
स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या तीन बहिणींची चौकशी
पोलीस सूत्रांनी सांगितले की, रश्मी, काजल आणि श्वेता या तीन महिलांची चौकशी सुरू केली आहे. या तिन्ही महिला स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या सख्ख्या बहिणी आहेत. श्वेता नावाची महिला इन्स्टिट्यूटमध्ये डीन आणि इतर दोघी वॉर्डन आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामी चैतन्यानंद सरस्वती याने इन्स्टिट्यूटमधील महिलांनाही आपल्या वासनेची शिकार बनवलं. काही महिलांसोबतही त्याने संबंध प्रस्थापित केले.
मुलांना हनी ट्रॅपमध्ये अडकवायचा
पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले आहे की, बाबा मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांना दागिने, महागड्या वस्तू, चष्मे भेट द्यायचा. तो काही मुलींना अल्मोडालाही घेऊन गेला होता.
बाबा चैतन्यानंद हा मुलांना हनी ट्रॅपमध्ये अडकवत होता. चैतन्यानंदने एका मुलीला सांगितले होते की, एका मुलासोबतचा अश्लील फोटो मला पाठव. त्याला मिठी मार आणि मला फोटो पाठव. बाबा त्या मुलीच्या माध्यमातून त्या मुलाला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी बाबाने त्या मुलीला पैसे दिले होते.