भीषण! पाच मुलांच्या आईचा गळा चिरलेला मृतदेह शेतात सापडला, पोलिसांचा तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 05:14 PM2022-01-14T17:14:53+5:302022-01-14T17:16:17+5:30

Murder Case : मिळालेल्या माहितीनुसार, रसुलपूर खेडी गावातील मिश्रीलाल यांची पत्नी सीमा (35) ही गुरुवारी दुपारी 4 वाजता माहेरी आली.

Awful! The body of a mother of five childrens was found in a field, police investigation started | भीषण! पाच मुलांच्या आईचा गळा चिरलेला मृतदेह शेतात सापडला, पोलिसांचा तपास सुरु

भीषण! पाच मुलांच्या आईचा गळा चिरलेला मृतदेह शेतात सापडला, पोलिसांचा तपास सुरु

Next

सहारनपूरच्या नागल पोलीस स्टेशन हद्दीतील रसूलपूर खेडी गावात शुक्रवारी सकाळी एक खळबळजनक घटना घडली. येथे पाच मुलांच्या आईचा गळा चिरून खून करण्यात आला. महिलेचा गळा चिरलेला मृतदेह जंगलात पडलेला आढळून आला. माहितीनंतर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिकच्या मदतीने घटनास्थळी तपास केला. शेजारच्या गावात राहणाऱ्या मृताच्या प्रियकरावर अनैतिक संबंधातून खून केल्याचा आरोप मृताच्या पतीने केला आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, रसुलपूर खेडी गावातील मिश्रीलाल यांची पत्नी सीमा (35) ही गुरुवारी दुपारी 4 वाजता माहेरी आली. तिच्या पतीच्या म्हणण्यानुसार, ती रात्री 10 वाजता अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, मात्र काही सुगावा लागला नाही. शुक्रवारी सकाळी गावातील लोक शेताकडे गेले असता सीमाचा गळा चिरलेला मृतदेह शेतात पडलेला आढळून आला.

पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ ठेवला व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस, म्हणून पतीने केले हे कृत्य

यानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले. माहिती मिळताच सीओ देवबंद दुर्गा प्रसाद तिवारी, एसएचओ बिनू चौधरी, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी तपास करून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सीओ दुर्गा प्रसाद तिवारी यांनी सांगितले की, मृताच्या पतीने सीमाच्या हत्येचा आरोप शेजारील गावातील ग्रामस्थावर केला आहे. सीमाचे आरोपीसोबत अवैध संबंध होते, असा आरोप आहे. तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मृत महिला पाच मुलांची आई होती. तिला एक मुलगा आणि चार मुली आहेत. सर्वात मोठा मुलगा १४ वर्षांचा आहे, तर सर्वात लहान मुलगा फक्त दोन वर्षांचा आहे. सीमाच्या हत्येनंतर तिच्या मुलांची अवस्था वाईट झाली आहे. त्यांचे मातृछत्र हरवले आहे. 

Web Title: Awful! The body of a mother of five childrens was found in a field, police investigation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app