Attack on Tadipar goon who went to buy clothes with a friend | मित्रासोबत कपडे खरेदी करण्यास गेलेल्या तडीपार गुंडावर हल्ला, गुन्हा दाखल

मित्रासोबत कपडे खरेदी करण्यास गेलेल्या तडीपार गुंडावर हल्ला, गुन्हा दाखल

ठळक मुद्देतडीपार गुंड समाधान निकम यांच्यावर हल्ला होऊन उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर : मित्रासोबत कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या तडीपार गुंडावार कॅम्प नं-२ परिसरात गुरवारी दुपारी अड्डीच वाजता तिघांनी जुन्या भांडणाच्या रागातून चाकू हल्ला केला. गंभीर जंखमी झालेल्या गुंडावर क्रीटिकेअर रूग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी उल्हासनगरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर कॅम्प नं-१ तेजुमल चक्की समाधान निकम याला मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, रायगड जिल्हातून तडीपार करण्यात आले होते. तडीपार शिक्षेचा भंग करून तो शहरात सर्रासपणे राहत असल्याचे उघड झाले. गुरवारी दुपारी अड्डीच वाजण्याच्या दरम्यान मित्र राहुल वंजारी याच्या सोबत कॅम्प नं-२ परिसरात कपडे खरेदी करण्यासाठी गेला होता. मार्केट मधून बाहेर आल्यानंतर जुन्या भांडणाच्या रागातून पियूष, रोहित व नारायण घरटे यांनी जुन्या भांडणाच्या रागातून समाधान निकम याला शिवीगाळ, मारहाण करून चाकू हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या निकम याला शहरातील क्रीटीकेअर रूग्णालयात उपचारसाठी भरती करण्यात आले. राहुल वंजारी याच्या तक्रारी वरून तिघा विरोधात उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

तडीपार गुंड समाधान निकम यांच्यावर हल्ला होऊन उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची माहिती पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकारी यांना समजल्यावर क्रीटीकेअर रूग्णालयात उपचार घेत असलेल्या समाधान निकम यांच्यावर तडीपार गुन्ह्याचा भंग केल्या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोन दिवसा पूर्वीच मध्यवर्ती पोलिसांनी एका तडीपार गुंडाला तडीपारीचा भंग केल्या प्रकरणी अटक केली. पोलिस परिमंडळातून तडीपार केलेल्या गुंडाची चौकशी केलीतर, बहुतांश गुंड परिमंडळ हद्दीत सर्रासपणे राहत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यांना राजकीय व पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चाही होत असून पोलिस प्रशासन बघाची भूमिका वठवित आहेत. अशी टीका सर्वस्तरातून होत आहे.
 

Web Title: Attack on Tadipar goon who went to buy clothes with a friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.