शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अतिदक्षता विभागात दाखल न केल्याने परिचारिकेवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 06:55 IST

काेराेनाबाधित पळाला; पाेलिसांनी घेेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असल्यामुळे भीतीने काेराेनाबाधित रुग्णाने अतिदक्षता विभागात दाखल करण्याची मागणी केली. मात्र त्याला दाखल न केल्याच्या रागात, त्याने परिचारिकेवर हल्ला करून पळ काढल्याची घटना एलिझाबेथ रुग्णालयातील कोविड केंद्रात घडली. पोलिसांनी रुग्णाचा शोध घेऊन त्याला वरळी कोविड सेंटरमध्ये दाखल केले.

परिचारिका किरकोळ जखमी झाली आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडली असून याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.एन. एम. जोशी मार्ग परिसरात संबंधित रुग्ण राहण्यास आहे. १३ एप्रिलला त्याला एलिझाबेथ रुग्णालयातील कोरोना केंद्रात दाखल करण्यात आले होते. १५ एप्रिलला त्याला श्वास घेण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे त्याने अतिदक्षता विभागात दाखल करण्याचा आग्रह धरला. मात्र परिचारिकेने तपासून अतिदक्षता विभागाची आवश्यकता नसल्याचे सांगितले. याच रागातून मध्यरात्री दोनच्या सुमारास त्याने परिचारिकेवर चाकूहल्ला केला.  तिला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या डॉक्टरांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तेथून पळ काढला.

एलिझाबेथ रुग्णालयाच्या  काेराेना केंद्रातील घटनाएलिझाबेथ रुग्णालयाच्या  काेराेना  केंद्रात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाअंती रस्त्यावर फिरणाऱ्या या रुग्णाला ताब्यात घेऊन वरळीच्या कोविड सेंटरमध्ये हलवले. ताे कोरोनामुक्त झाल्यावर त्याला अटक करण्यात येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या