महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण, दोन जणांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 17:34 IST2019-04-04T17:33:03+5:302019-04-04T17:34:21+5:30

महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

the atrocity case filed on 2 persons | महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण, दोन जणांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल 

महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण, दोन जणांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल 

लोणावळा : पाटण (ता.मावळ)  येथील महिला सरपंच रुपाली मंगेश पटेकर यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकारणी पाटण गावातील दोन जणांच्या विरोधात मारहाणीसह अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.
    रुपाली मंगेश पाटेकर (वय२८, रा. पाटण, ता.मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन,  पाटण गावातील शंकर दिनकर तिकोने व बबन भवानजी तिकोने (दोघेही रा. पाटण, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ( दि. ३) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास रुपाली पटेकर ह्या त्यांच्या घराच्यासमोर ओट्यावर भांडी घासत असताना त्याठिकाणी आलेले शंकर तिकोणे व बबन तिकोणे यांनी रुपाली यांना जातीवाचक व अश्लिल शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली, यावेळी भांडण सोडविण्याकरिता आलेल्या पटेकर यांच्या सासू इंदाबाई पटेकर व सासरे मारुती पटेकर यांना देखील शिवीगाळ करत हाताने व काठीने मारहाण केली. तसेच पटेकर यांना हाताला धरुन अंगावर ओढून मनाला लज्जा निर्माण होईल अशा प्रकारे झटापट करून मिठी मारत विनयभंग केला. त्यानंतर घराशेजारच्या काटेरी तारेवर ढकलून देत जखमी केले. 
    याप्रकरणी पटेकर यांच्या तक्रारीवरुन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे तपास करत आहेत.

Web Title: the atrocity case filed on 2 persons