Ashok Kharat : अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द; फार्महाऊसवर सापडली २१ काडतुसं, ८ गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 11:41 IST2026-03-27T11:33:16+5:302026-03-27T11:41:31+5:30

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात याचा पिस्तुल परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

Ashok Kharat's pistol license revoked; 21 cartridges found at farmhouse, 8 cases registered | Ashok Kharat : अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द; फार्महाऊसवर सापडली २१ काडतुसं, ८ गुन्हे दाखल

Ashok Kharat : अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द; फार्महाऊसवर सापडली २१ काडतुसं, ८ गुन्हे दाखल

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याचा पिस्तुल परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. खरातविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल असून त्याचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करीत आहे.

तपासादरम्यान ताब्यातील खरातच्या शस्त्रसाठ्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली होती. तर त्याच्या घरातून जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती, फार्महाऊसवरून एकूण २१ काडतुसे सापडली होती. यामध्ये पाच काडतुसे वापरलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही काडतुसे नेमकी कोणत्या कारणासाठी वापरण्यात आली, याचा तपास सध्या सुरू आहे. 

"नादाला लागाल तर तुमचे नामोनिशाण नष्ट करू"; भोंदू अशोक खरातने अंनिसला दिलेली धमकी

"... तर तुझा मृत्यू अटळ", भोंदूबाबा अशोक खरातने थेट तुर्कस्थानातून मागवलं ९० लाखांचं फर्निचर

खरातकडे परवानाधारक पिस्तुल असल्याचेही तपासात उघड झाले होते. मात्र या शस्त्राचा गैरवापर झाला आहे का, याबाबत शंका उपस्थित झाल्याने प्रशासनाने त्याचा पिस्तुल परवाना रद्द केला आहे. एसआयटी पथकाकडून पिस्तुलाचा वापर, काडतुसांचा स्रोत आणि त्यामागील उद्देश याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. खरातने पोलिस कोठडीत काडतुसे कुठे वापरली याची माहिती तपास पथकाला अद्याप दिलेली नाही. मी पिस्तुलाचा परवाना स्वतःच्या रक्षणासाठीच मिळविला होता, अशी सबब भोंदू खरातने पोलिसांना सांगितली.

Web Title : अशोक खरात का पिस्तौल लाइसेंस रद्द; 21 कारतूस बरामद, 8 अपराध दर्ज

Web Summary : धोखेबाज अशोक खरात का पिस्तौल लाइसेंस आठ गंभीर अपराधों के कारण रद्द कर दिया गया। उसके फार्महाउस पर इक्कीस कारतूस मिले, जिनमें से पाँच इस्तेमाल किए गए थे। एसआईटी कारतूसों के स्रोत और उद्देश्य और पिस्तौल के संभावित दुरुपयोग की जांच कर रही है।

Web Title : Ashok Kharat's Pistol License Revoked; 21 Cartridges Found, 8 Crimes

Web Summary : Fraudster Ashok Kharat's pistol license was canceled due to eight serious crimes. Twenty-one cartridges were found at his farmhouse, with five used. An SIT is investigating the source and purpose of the cartridges and potential misuse of the pistol.