शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अशोक खरात चाळीस दिवसांपासून तुरुंगातच; १४ वेळा न्यायालयात हजेरी, पहिल्या १२ गुन्ह्यांची सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 08:16 IST

पीडितेवर उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा भोंदू खरातने घेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारणी सातवा गुन्हा खरातवर दाखल करण्यात आला आहे.

नाशिक - भोंदू अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात रविवारी (दि. २६) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात  आली. मात्र त्याला लगेचच सातव्या गुन्ह्यात एसआयटीने ताब्यात घेतले. त्यामुळे या गुन्ह्याप्रकरणी खरातला सोमवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाईल. खरातचे रविवारी पोलिस कोठडीतले ४० दिवस पूर्ण  झाले. १२ गुन्हे त्याच्यावर नाशिक शहरात दाखल आहेत. १४ वेळा त्याला या ४० दिवसांत न्यायालयासमोर  हजर करण्यात आले आहे. यापैकी फक्त चार वेळेसच त्याला कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर  करण्यात आले आहे. 

प्रारंभी जे १२ गुन्हे नाशिमधील सरकारवाडा पाेलिस ठाण्यात खरातवर दाखल आहे त्या प्रकरणी सध्या सुनावणी होत आहे. नंतर खरातचा ताबा शिर्डी तसेच सिन्रर पोलिस घेतील. एकूण दहा वेळा सुरक्षेच्या कारणास्तव खरात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारेच न्यायालयासमोर हजर झाला असून प्रत्येक सुनावणीदरम्यान न्यायाधीश त्याला काही बोलायचे आहे का? असा सवाल करतात, मात्र तो फक्त मान हलवून नाही म्हणतो अन् कोर्टात चाललेला दोघा बाजूचा युक्तिवाद ऐकत बसतो. मात्र तो पूर्वीपेक्षा बराच खचलेला दिसून येत आहे. पीडितेवर उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा भोंदू खरातने घेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारणी सातवा गुन्हा खरातवर दाखल करण्यात आला आहे.

खरात प्रकरणात सहभाग आढळणारे बडतर्फ होणारभोंदू अशोक खरात प्रकरणात महसूल विभागातील ज्या अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळून येईल, त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. रविवारी शिर्डीत सहकुटुंब साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, अशोक खरात याने जमीन लाटणे किंवा खरेदी-विक्री केल्याच्या प्रकरणात महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती पुढे येत आहे. 

स्मृतिभ्रंशाचे नाटक अत्याचार करण्यापूर्वी पीडितेला खरातकडून गुंगी येईल, असे पदार्थ दिले जात होते. आणि या औषधांचा पुरवठा त्याला कुठून व्हायचा, यावर खरात मौन बाळगून आहे. तो स्मृतिभ्रंशाचे नाटक करत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. पीडित महिलेला तो जाळ्यात कसा ओढायचा यावरही खरातने काहीच खुलासा केलेला नाही, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ashok Kharat Remains in Jail After 40 Days, Hearing Ongoing

Web Summary : Fraudster Ashok Kharat remains jailed, facing multiple charges in Nashik. Authorities investigate possible involvement of revenue officials. Kharat feigns memory loss regarding drugging victims, hindering the investigation. Court proceedings continue; Kharat appears weakened.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरात