शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

Aryan Khan Drugs Case: अनन्या पांडेचा मोबाईल, लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबकडे, डिलीट केलेले सर्व मेसेज व नंबर एनसीबी पुन्हा मिळविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 7:25 AM

Ananya Panday : अनन्याने मोबाइल व लॅपटॉपमधील मेसेज आणि काही कॉन्टॅक्ट नंबर डिलीट केले असण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांमार्फत ते पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. गेल्या दोन दिवसांत अनन्या पांडे हिची एनसीबीने जवळपास साडेसहा तास चौकशी केली आहे.

मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या तपासातून अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) रडारवर आलेली अभिनेत्री अनन्या पांडे  हिच्यासमोरील अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.  तिच्याकडून ताब्यात घेण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक गॅझेट  तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत.

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्याबरोबर केलेल्या संदेशाच्या देवाण-घेवाणीची आणि  काही नावांची  शहानिशा त्यातून केली जाणार आहे. अनन्याने मोबाइल व लॅपटॉपमधील मेसेज आणि काही कॉन्टॅक्ट नंबर डिलीट केले असण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांमार्फत ते पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. गेल्या दोन दिवसांत अनन्या पांडे हिची एनसीबीने जवळपास साडेसहा तास चौकशी केली आहे.

ती पूर्ण न झाल्याने येत्या सोमवारी तिला पुन्हा  चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तिने आर्यन खानसमवेत केलेल्या ड्रग्जसंबंधीचा व्हाॅट्सॲप चॅट महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. त्याशिवाय ड्रग्जच्या अनुषंगाने दोघांमध्ये पूर्वीही वेळोवेळी संभाषण झाले असल्याची शक्यता एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. तिच्याकडून जप्त करण्यात आलेले दोन्ही मोबाइल फोन, लॅपटॉप व अन्य इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. त्याशिवाय अनन्या व आर्यन आणि इतरांमध्ये आर्थिक व्यवहार झाला असल्याच्या शक्यतेने तिच्याकडे चौकशी केली जाणार आहे. 

विविध कार्ड, बँक व्यवहार तपासले जातील. अनन्या शुक्रवारी तीन तास उशीरा कार्यालयात पोहोचली. त्यामुळे एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी तिला हे प्रोडक्शन हाऊस नव्हे, सरकारचे कार्यालय आहे. त्यामुळे इथे वेळेवर यायला हवे अशा शब्दांत सुनावले.

सात इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेतले ताब्यात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री अनन्या पांडेचे सात इलेक्ट्रॉनिक गॅजेट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये मोबाईल आणि लॅपटॉपचाही समावेश आहे. फॉरेन्सिक तपासणीद्वारे एनसीबीला त्या चॅट्स आणि इतर तपशील जाणून घ्यायचा आहे, जे कदाचित हटविण्यात आले असतील. एनसीबीला हे चॅट्स रिट्राइव्ह करायचे आहेत. सोमवारपर्यंत हा डेटा पुन्हा मिळाल्यास अनन्या पांडेची त्या आधारावर चौकशी केली जाणार आहे.

टॅग्स :Ananya Pandeyअनन्या पांडेAryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो